जिल्ह्याधिकाऱ्यांना अविनाश चव्हाण याने एक पत्र लिहिले. “आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला सोबत राहू देत नाही”, असं म्हणत अविनाशने कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्याला स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रकरणी पोलीस प्रशासन पुढचा तपास करत आहेत.
Home Maharashtra Ahmednagar Sarpanch Takes Poison, विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने जिल्हाधिकारी...
Ahmednagar Sarpanch Takes Poison, विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, प्रेमवीर सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयातच घेतलं विष – ahmednagar sarpanch does not allow married girlfriend to stay with him takes poison the collector office
अहमदनगर : विवाहित प्रेयसीसोबत राहू देत नाही, कुटुंबाकडून दोघांनाही त्रास दिला जात असल्याची तक्रार करत जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न श्रीगोंदा तालुक्यातील घोटी येथील सरपंच अविनाश चव्हाण याने केला आहे. ही घटना काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.