नवी दिल्ली: मूळची वसईची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफताबनं सहा महिन्यांपूर्वी दिल्लीत निर्घृण हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते आधी फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर दररोज रात्री एक-एक तुकडा जवळ असलेल्या जंगलात फेकला. श्रद्धा आणि आफताब छतरपूर येथे एका फ्लॅटमध्ये राहत होते. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब त्याच फ्लॅटमध्ये एका तरुणीला घेऊन आला होता. या तरुणाचा जबाब दिल्ली पोलिसांनी नोंदवला आहे.

आफताब पुनावालाबद्दल दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही माहिती ऐकून आफताबला भेटलेल्या तरुणीला मानसिक धक्का बसला आहे. सध्या तिचं समुपदेशन सुरू आहे. आफताब कोणाची हत्या करेल, असं त्याच्या वागण्यावरून कधीच वाटलं नाही, असं तरुणीनं पोलिसांना सांगितलं. आफताब नेहमीच सर्वसामान्यांसारखा वाटला. तो अतिशय काळजी घेणारा माणूस असल्याचं मला वाटलं, असं पेशानं मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या तरुणीनं पोलिसांना सांगितलं.
फाशी मिळाली तरी पश्चाताप नाही, कारण…; पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबचं खळबळजनक विधान
आफताब आणि श्रद्धा छतरपूरमध्ये वास्तव्यास होते. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबनं मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या तरुणीला फ्लॅटमध्ये बोलावलं होतं. तरुणी आफताबला भेटायला आली त्यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्लॅटमध्ये असलेल्या फ्रिजमध्ये होते. मात्र घरात हत्या घडली असावी याबद्दल तरुणीला जराही संशय आला नाही. आफताबसोबत झालेल्या संवादाची, त्याच्या स्वभावाची माहिती तरुणीनं पोलिसांना दिली.

आफताबनं संबंधित तरुणीला फॅन्सी, आर्टिफिशियल रिंग दिली. आफताबनं तरुणीला दिलेली अंगठी श्रद्धाची होती, असं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. आफताबनं तरुणीला विविध प्रकारचे परफ्युम्स दिले होते. आफताबला विविध प्रकारचे परफ्युम, डिओ वापरण्याचा छंद आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारच्या परफ्युम आणि डिओंचं कलेक्शन आहे. आफताब कधीच घाबरलेला वाटला नाही. तो अतिशय सामान्य वागत होता, असं तरुणीनं पोलिसांना सांगितलं.
मित्रानं घेतली स्पोर्ट्स बाईक, दोघे ट्रायलसाठी सुसाट निघाले; बराच वेळ परतलेच नाहीत अन् मग..
आफताब खूप काळजी करायचा. तो त्याच्या मुंबईतील घराबद्दल बोलायचा. सिगारेट जास्त ओढायचा. पण त्याचवेळी सिगारेट सोडण्याबद्दलही बोलायचा. आफताबला विविध प्रकारचे पदार्थ आवडतात. त्यातही शाकाहारी जास्त आवडतं. तो वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समधून घरी जेवण मागवायचा, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या तरुणीनं पोलिसांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here