Authored by पवन येवले | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Nov 2022, 3:51 pm

Nashik News : शिर्डीहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबईच्या साई भक्तांवर नियतीने घात केला आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर-शिर्डी महामार्गावरील देवपूर फाट्याजवळ या साई भक्तांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात २ जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

 

Sinner Shirdi Road Accident News
साईभक्तांवर काळाचा घाला, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली; दोघांचा जागीच मृत्यू
नाशिक : शिर्डीहून दर्शन घेऊन परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या मुंबईच्या साई भक्तांवर नियतीने घात केला आहे. नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर-शिर्डी महामार्गावरील देवपूर फाट्याजवळ या साई भक्तांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात २ जण जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील काही साईभक्त दर्शनासाठी शिर्डीला आले होते. यावेळी ते दर्शन घेऊन परतीच्या मार्गावर असताना तवेरा SUV कार क्रमांक (एम. एच ०४ क्यू. झेड ९२२८) या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिन्नर जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. गाडीचा वेग जोरात असल्याने गाडीने महामार्गावरून दीडशे फूट लांब पलटी घेतल्याने वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात मीरा-भाईंदर येथील इंद्रदेव मोरया (वय २८) आणि सत्येंद्र यादव (वय २७) यांना गंभीर मार लागल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून या वाहनातील आणखी सात जण गंभीर जखमी आहेत.

IND vs NZ तिसरी वनडे: पावसामुळे मॅच थांबली, DLS लागू झाल्यास भारत सामना जिंकेल का?
दरम्यान, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि काही स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आले त्यानंतर रुग्णवाहिका बोलून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

IND v NZ 3rd ODI तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाचा विजय, मालिकेत न्यूझीलंडने बाजी मारली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here