मुंबई: बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजाराने पुन्हा इतिहास रचला आहे. भारतीय शेअर बाजार दररोज स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडत असून आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे बुधवारी, सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही बंपर उसळी घेतली आणि नवीन शिखर गाठले. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ६३ हजारांचा टप्पा ओलांडला, तर निफ्टीही १९ हजार अंकांच्या जवळ पोहोचला आहे.

देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणूकदारांकडून प्रचंड खरेदीमुळे बाजारात मोठी तेजी दिसून आली. आणि आजच्या व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ४१८ अंकांच्या उसळीसह ६३,१०० च्या विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. तर निफ्टीने १४० अंकांच्या वाढीसह १८,७५८ अंकांवर व्यवहार बंद आहे. सलग पाचव्या ट्रेडिंग सत्रात भारतीय बाजारांनी नवीन उंची गाठली आहे.

जबरदस्त कमाईची संधी! टाटा समूहाचा हा शेअर ५२१ रुपयांवर जाण्याची शक्यता, पाहा गुंतवणूकदारांनी काय करावं
क्षेत्रीय निर्देशकांची स्थिती
बाजारातील सरकारी बँकेचा निर्देशांक वगळता सर्वच क्षेत्रातील समभागांमध्ये जबरदस्त खरेदी दिसून आली. दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, धातू, रिअल इस्टेट, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. किरीट पारिख समितीच्या शिफारशींचा परिणाम गॅस कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला आहे.

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांमध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २३ वाढीसह तर ७ समभाग घसरणीत बंद झाले. तर निफ्टीच्या ५० पैकी ४२ समभाग वधारले आणि केवळ ६ समभाग लाल चिन्हात बंद झाले. बीएसई सेन्सेक्सवर ३६०२ शेअर्सच्या ट्रेडिंगमध्ये २०७० शेअर्स वाढीसह बंद झाले आणि १४२९ शेअर्स खाली घसरले.

अदानींचा NDTV च्या मंडळात प्रवेश, शेअर्सने पकडला रॉकेट स्पीड; एका बातमीने समभागात तुफान उसळी
कोणते शेअर्स चढले
बाजाराला ऐतिहासिक पातळीवर नेण्यात समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.१६ टक्के, पॉवर ग्रिड २.१४ टक्के, एचयूएल १.७८ टक्के, भारती एअरटेल १.७१ टक्के, यांचा समावेश आहे. तसेच टायटन कंपनी १.५९ टक्क्यांनी, एशियन पेंट्स १.५१ टक्क्यांनी आणि टाटा स्टील १.५१ टक्क्यांनी वाढून बंद झाले.

शेअर बाजारात विक्रमी तेजी, गुंतवणूकदारांनी काय करावं; गुंतवणुकीचे तुमच्याकडे कोणते पर्याय?
कोणते शेअर्स घसरले
आज बाजारात इंडसइंड बँकेचे शेअर्स १.०२ टक्के, एसबीआय ०.९७ टक्के, एचसीएल टेक ०.६६ टक्के, आयटीसी ०.५८ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३३ टक्के, बजाज फायनान्स ०.१७ टक्के आणि टीसीएस ०.१४ टक्क्यांनी घसरले.

जीडीपी आकडेवारीवर नजर
दरम्यान आज भारतीय बाजाराचा वेगही महत्त्वाचा आहे कारण चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील (जुलै-सप्टेंबर) जीडीपीचे आकडेही जाहीर होणार आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) द्वारे जारी केला जाणारा डेटा कृषी, उत्पादनासह इतर क्षेत्रांच्या कामगिरीची माहिती देखील देईल. तर गेल्या आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८.४ टक्के होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here