Maharashtra Politics | राज ठाकरे यांनी आज इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. तब्बल अर्धा तास पवार आणि ठाकरे यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून यावेळी इतिहास आणि त्यामधून निर्माण होत असलेल्या आकृती तसेच सिनेमामध्ये सध्या चुकीच्या पद्धतीने दाखवत असलेल्या चुकीच्या इतिहास यावर ही चर्चा झाली आहे.

हायलाइट्स:
- राज ठाकरे यांना इतिहासाबाबत प्रचंड आस्था आहे
- तो इतिहास लोकांना कळवा असा त्यांचा प्रयत्न असतो
चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या इतिहासवर चर्चा
राज ठाकरे यांनी आज इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांची कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली आहे. तब्बल अर्धा तास पवार आणि ठाकरे यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून यावेळी इतिहास आणि त्यामधून निर्माण होत असलेल्या आकृती तसेच सिनेमामध्ये सध्या चुकीच्या पद्धतीने दाखवत असलेल्या चुकीच्या इतिहास यावर ही चर्चा झाली आहे. यावेळी त्यांनी जयसिंगराव पवार यांनी लिहिलेले पुस्तकांची पाहणी करत कौतुकही केले.
याबाबत बोलताना जयसिंगराव पवार म्हणाले राज ठाकरे यांना इतिहासाबाबत प्रचंड आस्था आहे. तो इतिहास लोकांना कळवा असा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र, अनेक चित्रपटमध्ये चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असून ‘वेडात वीर मराठी दौडले सात’ याबाबत चर्चा झाली असून सोबत छत्रपती ताराराणी यांचे ग्रंथ भेट देत एका वेळेला माझ्याबद्दल बोललं नाही तरी चालेल मात्र ताराराणी यांच्यावर बोला असा त्यांनी राज ठाकरे यांना दिला.
तुम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार
जयसिंगराव पवार यांनी राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, तुमची बाळासाहेबांसारखे ठासून बोलण्याची शैली तसेच तुमचा प्रामाणिकपणा पाहिला तर तुम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. मात्र, तुम्ही घेत असलेले अनेक उपक्रम हे मध्येच बंद पडतात, अशी खंत व्यक्त केली. शिवाय राज ठाकरे यांच्यासारख्या माणसाच्या हातात राज्याची सत्ता गेली तर काहीतरी चांगले होईल, अशी अपेक्षा असल्याचे जयसिंगराव पवार म्हणाले आहेत. खरंतर राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाला घेऊन चालणारे, मात्र पुरंदरे यांच्या इतिहासाला अनेक वेळा खोडून काढत खरा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केला आहे. मात्र, याबाबत आज कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवार म्हणाले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.