मे महिन्यात श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने या नवीन मुलीला डेट करायला सुरूवात केली. दोघांची भेट त्याच बंबल ॲपवर झाली ज्याद्वारे श्रद्धा आणि आफताब यांची भेट झाली होती. ही नवीन मैत्रीण ऑक्टोबरमध्ये दोनदा आफताबच्या घरी आली होती. १२ ऑक्टोबरला आफताबने तिला अंगठी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिच्याकडून ही अंगठी जप्त केली असून तिचा जबाब नोंदवला आहे.
आफताबची नवीन गर्लफ्रेंड कोण आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, श्रद्धाच्या हत्येनंतर १२ दिवसांनी दोघे ३० मे रोजी संपर्कात आले होते. आफताबची नवी गर्लफ्रेंड मानसोपचारतज्ज्ञ आहे. शरीराचे तुकडे इथे ठेवले आहेत. आफताबच्या चेहऱ्यावर कधीही भिती दिसली नाही, असंही तिने सांगितलं.
आफताबच्या गाडीवर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांचा तलवारींनी हल्ला
सध्या दिल्ली पोलिसांकडून आफताबची पॉलिग्राफ टेस्ट सुरु आहे. यासाठी आफताबला सोमवारी रोहिणी परिसरातील फॉरेन्सिक लॅबमध्ये पॉलिग्राफ टेस्टसाठी नेण्यात आले होते. ही टेस्ट झाल्यावर आफताबला पुन्हा तुरुंगाच्या दिशेने नेले जात होते. पोलिसांच्या गाडीतून त्याला तुरुंगाकडे नेले जात असताना त्याठिकाणी अचानक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आले. त्यांच्या हातात तलवारी होत्या. या तलवारींच्या साहाय्याने हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आफताबच्या गाडीवर हल्ला केला. तलवारींच्या साहाय्याने हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर घाव घातले. हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीचा दरवाजा उघडून आत शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लोखंडी गजांमुळे हल्लेखोरांना आफताबपर्यंत पोहोचता आले नाही.
बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले