सांगली: हल्लीच्या काळात एखाद्या मित्राच्या वाढदिवसाला सोशल मीडियावरुन किंवा नाक्यावर बॅनर्स लावून शुभेच्छा देण्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. या बॅनर्सवर किंवा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये उत्सवमूर्ती असलेल्या मित्राचा उल्लेख ‘दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस’, ‘आपला भाऊ’ अशा अनेक विशेषणांनी केला जातो. पण यामध्ये खऱ्या मैत्रीचा भाव कितपत असतो, याबाबत शंकाच असते. पण सांगलीतील काही शाळकरी विद्यार्थ्यांनी मैत्री म्हणजे काय असते आणि वेळ पडल्यावर मित्राच्या मदतीला कसे धावून जायचे असते, हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या मैत्रीची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सांगली जिल्ह्यातील नागाव कवठेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेली एक घटना मैत्रीच्या दुनियेला सलाम करणारी आहे. पाचवीतील घट्ट मैत्रीची ही कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. गावातील मुलांची शाळेतील ही मैत्री काय करू शकते हे यातून पाहिले मिळते. इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा एक गरीब विद्यार्थी रोजच्या प्रमाणे शाळेत यायचा,पण दोन-तीन दिवसांपासून तो वर्गात बसल्यावर सतत अंग खाजवत असायचा,त्याचे सततचे खाजवण्याने त्याच्या अंगावर व्रण देखील उठले होते. त्याच्या या खाजवण्याबाबत मित्रांच्या मध्ये चर्चा सुरू होती,मग मित्रांनी त्या मित्राला खाजवण्याबाबत विचारले असता,त्याने अंगावर पुरळ उठल्याचे सांगितले.सर्व मित्रांनी त्याचे अंगावरचे पुरळ आणि व्रण पाहिल्यावर,औषध उपचार का केले नसल्याची विचारणा केली,यावर कुटुंबाची औषधोपचार करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे समोर आले.

या गोष्टींमुळे मित्रांचे मन हेलावून गेले, मग आठ-दहा मित्रांनी, आपल्या मित्राचा उपचार आपण करायचा ठरवला, मग त्यासाठी मित्रांनी आपल्या घरातून खाऊसाठी पैसे आणण्याचे ठरवले आणि सर्वांनी घरातून पैसे देखील आणले. मग गोळा केलेल्या पैश्यातून मित्रांनी दुकानातून औषध विकत आणले. त्यानंतर मित्राला औषध दिले,व औषधानंतर त्या मित्राच्या अंगावरील पुरळ जवळपास कमी झाले. पैसे गोळा करण्याबरोबर,औषध खरेदी करे पर्यंत सर्व मित्रांनी आपल्या आजारी असलेल्या मित्राला ,किंवा पालक आणि शिक्षकांना याची कल्पना होऊ दिली नव्हती,आणि मित्राला केलेल्या या मदतीचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.

पण मित्राला केलेल्या या मदतीची वाच्यता पंधरा दिवस पर्यंत कोणीच केली नव्हती. अखेर एका मुलाने पंधरा दिवसांनी ही गोष्ट आपल्या घरी सांगितले. त्यानंतर गावात मैत्रीची बातमी पसरल्यावर गावातील डॉ,संदीप पाटील यांनी याची दखल घेऊन,मित्राला मदत करणाऱ्या त्याच्या विद्यार्थी मित्रांना प्रत्येकी १०१ रुपयांचा बक्षीस देऊ केले. मग शाळेत देखील या मुलांचा सत्कार पार पडला. आता या मुलांचं गावातंच नव्हे तर सगळीकडे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here