Udayanraje Bhosale in Satara press conference | प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुनही मी त्याठिकाणी गेलो नाही, हा दावाही उदयनराजे भोसले यांनी सपशेल फेटाळून लावला. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला नाही. कुणीच फोन केला नाही. खोटं बोलायचं कारण नाही. मला कार्यक्रमाबद्दल कुणी सांगितले नव्हते, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

 

Udyanraje Bhosale in Satara PC
उदयनराजे भोसलेंची पत्रकार परिषद

हायलाइट्स:

  • उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात पत्रकार परिषद
  • उदयनराजेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
सातारा: काही दिवसांपूर्वीच झालेल्या पत्रकार परिषदेत मी भावनिक झालो. मी तेव्हा रडलो म्हणजे मी काही हतबल वगैरे झालेलो नाही. मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. वेळ आल्यावर मी काय करायचे ते करेन, असे वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ते बुधवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मी हतबल वगैरे झालेलो नाही, असे ठणकावून सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने होता का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कारण, उदयनराजे भावूक झाल्यानंतर फडणवीसांना प्रसारमाध्यमांशी बोलताना तशा धाटणीचे वक्तव्य केले होते. याशिवाय, शिवेंद्रराजे भोसले यांनीही उदयनराजे भोसले यांनी हतबल होऊ नये. रडायचं नाही, लढायचं, असा सल्ला देऊ केला होता.

मात्र, उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील आजच्या पत्रकार परिषदेत मी खंबीर असल्याचे सांगितले. तसेच प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुनही मी त्याठिकाणी गेलो नाही, हा दावाही उदयनराजे भोसले यांनी सपशेल फेटाळून लावला. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला नाही. कुणीच फोन केला नाही. खोटं बोलायचं कारण नाही. मला कार्यक्रमाबद्दल कुणी सांगितले नव्हते. मी काल रात्रीच पुण्यावरुन उशिरा आलो. मी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. ते आपटून काल माझं काम होतं, ते काम करुन काल रात्री मला घरी यायला उशीर झाला. त्यानंतर आज सकाळी मला पत्रिका मिळाली. पत्रिका मिळाली म्हणून मला समजलं की, कार्यक्रम आहे आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री येत आहेत. नाहीतर मला कुणीच बोललं नाही, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले. उदयनराजे भोसले यांच्या फडणवीस आणि शिंदे यांच्याविषयीच्या काहीशा तिखट आणि रोखठोक प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

राज्यपालांसारखं उद्या कोणीही उठून बोलेल; राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: उदयनराजे भोसले

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यांचा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
राज्यपालांवरील कारवाईबाबत उदयनराजे ठाम, मुख्यमंत्र्यांनी फोन करुनही प्रतापगडावर आलेच नाहीत

शिवाजी महाराजांच्यावेळीच तिथी आणि तारखेचा वाद का?

उदयनराजे भोसले यांनी बुधवारी साताऱ्यात आणखी एक पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तारखेच्या मुद्द्यावर भाष्य केले. शिवाजी महाराजांच्या संदर्भात तिथी आणि तारखेचा वाद जाणीवपूर्वक केला जातो. शिवाजी महाराजांची जयंती तीन वेळा केली जाते. परदेशातील मित्र नेमकी खरी तारीख कोणती असं विचारतात. सर्व इतिहासकारांनी एकत्र येऊन १९ फेब्रुवारी तारीख ठरवली होती. मात्र, पुन्हा वाद निर्माण करण्यात आला, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here