Authored by सचिन जाधव | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Nov 2022, 8:51 pm

bhagat singh koshyari Vs Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील आजच्या पत्रकार परिषदेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा आगपाखड केली. एवढी मोठी घोडचूक करुन एखादा निर्लज्जच या पदावर राहु शकतो. एखादा वृद्धाश्रम बघून त्यात कोश्यारींनी जावं, त्या ठिकाणी तरी त्यांना घेतील का नाही हा प्रश्नच आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

 

Udyanraje Bhosale Vs Bhagat singh Koshyari
भगतसिंह कोश्यारींमुळे उदयनराजे भाजपमधून बाहेर पडणार?

हायलाइट्स:

  • माझ्यावर कारवाई करण्याची हिंमत पक्षश्रेष्ठी करणार नाहीत
  • कोणाला काय करायचं असेल ते करा
  • मला फरक पडत नाही
सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरुद्ध भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सध्या आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात माझ्यावर कारवाई करण्याची हिंमत भाजपश्रेष्ठींमध्ये नाही, असे अप्रत्यक्ष आव्हान देणारे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे. ते बुधवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात अद्याप कारवाई न झाल्याच्या मुद्द्यावरुन उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली.

मी जी भूमिका मांडतोय त्या विरोधात माझ्यावर कारवाई करण्याची हिंमत पक्षश्रेष्ठी करणार नाहीत. कोणाला काय करायचं असेल ते करा, मला फरक पडत नाही. मी पक्ष मानत नाही, छत्रपतींचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे, असा इशारा सुद्धा खासदार उदयनराजे यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई करून भाजपने हा वाद मिटवला नाही तर भाजपमध्ये राहायचे की नाही, याबाबत आपण विचार करु शकतो, असा अप्रत्यक्ष इशाराच उदयनराजे भोसले यांनी दिल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडल्यास अनेक पक्षांचे दरवाजे उदयनराजे भोसले यांच्यासाठी उघडे असल्याचीही चर्चा रंगली आहे.

मला प्रतापगडावरून मुख्यमंत्र्यांनी फोन केलाच नव्हता, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं

उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत आणखी काय म्हणाले?

राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा. वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना न्याय मिळावा म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. स्वराज्याची स्थापना म्हणजे आजची लोकशाही आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले .छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सांगणारी लोकं प्रत्येक पक्षात असली पाहिजेत.कोणत्याही पक्षातील आमदार खासदार आज शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण करतो. मगं चुकीचं विधानं करेल त्याला त्याच प्रकारची शिक्षा का होतं नाही असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.
राज्यपालांसारखं उद्या कोणीही उठून बोलेल; राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: उदयनराजे भोसले
सावरकर असो वा आणि कोणीही, शिवाजी महाराजांची तुलना कुणाही सोबत होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना इतरांसोबत करु नये, असे उदयनराजे यांनी सांगितले. मी कोणत्या पक्षातच राहायचं कोणत्या पक्षात जायचं हे मी ठरवेन. मी राष्ट्रवादीत जायचं का भाजपमध्ये रहायचं यावर नंतर ठरवता येईल. सध्या समोर एक प्रश्न वेगळा आहे त्याचं काय होतय हे पाहुद्यात, मग ठरवू, असा सुचक इशारा खासदार उदयनराजे यांनी दिला. एवढी मोठी घोडचूक करुन एखादा निर्लज्जच या पदावर राहु शकतो. एखादा वृद्धाश्रम बघून त्यात कोश्यारींनी जावं, त्या ठिकाणी तरी त्यांना घेतील का नाही हा प्रश्नच आहे. मात्र त्यांना आता एकच ठिकाण शिल्लक राहतं वेड्यांच हॉस्पिटल. त्या ठिकाणी त्यांनी जावं आणि आपला उपचार करावा, अशी खरमरीत टीकाही उदयनराजे भोसले यांनी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here