Authored by prasad lad | Maharashtra Times | Updated: 30 Nov 2022, 11:25 pm

yuzvendra chahal : युजवेंद्र चहल हा बऱ्याच खेळाडूंची मस्करी करत असतो आणि त्यांचे व्हिडिओ तयार करत असतो. पण आता या चहलचाच पर्दाफाश केला आहे तो भारताचा कर्णधार शिखर धवनने. पण धवनने जेव्हा हा व्हिडिओ केला तेव्हा तिथे चहलची पत्नी धनश्री वर्माही उपस्थित होती. या व्हिडिओमध्ये असं नेमकं घडलं तरी काय आहे पाहा…

 

yuzvendra chahal and his wife dhanashree verma
सौजन्य-ट्विटर
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू आता आपल्या पत्नीला परदेशी दौऱ्यावर घेऊन जाऊ शकतात. पण दौऱ्यावर नेल्यावर आपल्याच पत्नीसमोर नेमकं काय घडेल, याचा नेम नाही. कारण अशीच एक गोष्ट आता युजवेंद्र चहलच्याबाबत घडली आहे. भारताचा कर्णधार शिखर धवनने आता युजवेंद्र चहलचा पर्दाफाश केला आहे आणि तोदेखील त्याच्याच पत्नीसमोर. या गोष्टीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे.


चहल आणि त्याची पत्नी यांना बऱ्याचदा सर्वांनी सोशल मीडियावर पाहिले आहे. या दोघांचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत असतात. चहल तर काही क्रिकेटपटूंची मस्करीही या व्हिडिओमध्ये करत असतो. पण आता तर त्याचीच मजा धवनने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. धवनने एक खास व्हिडिओ बनवला आहे आणि यामध्ये चहलचा पर्दाफाश केला आहे.

हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील आहे. भारतीय संघ एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतानाचा हा व्हिडिओ आहे. भारतीय संघातील खेळाडू चालत असताना धवनने हा व्हिडिओ बनवला आहे. यामध्ये चहलकडे सर्वात जास्त सामान असल्याचे पाहायला मिळत आहे. चहलने आपल्या अंगावर दोन बॅग्स घेतल्या आहेत तर दोन बॅग्स तो सरकवत पुढे नेत आहे. हे पाहून तुम्हाला कुली पाहायचा असेल तर चहलकडे पाहा, असे धवनने यावेळी म्हटले आहे. चहल गेल्यानंतर त्याची पत्नी धनश्री ही फक्त एकच बॅग घेऊन चालत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी माझ्या पायाला दुखापत झाली आहे, त्यामुळे मी फक्त एकच बॅग घेऊन चालत आहे, असे धनत्रीेने म्हटले आहे. पण त्यानंतर धवन थांबला नाही. धवनने त्यानंतर म्हटले की, ” चहलचा एवढासा जीव आहे, तर त्याचं कसं काय होणार?”

धवनच्या या प्रश्नावर धनश्रीनेही चोख उत्तर दिले आहे. धनश्री यावेळी म्हणाली की, ” तुमच्या या मित्राला अजून पॉवरफूल बनू द्या…” सध्याच्या घडीला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कारण बऱ्याचदा चहल हा बाकीच्या खेळाडूंची मस्करी करत असतो, पण यावेळी मात्र चहलची बोलतीच बंद झाल्यचाे पाहायला मिळाले आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here