रिक्षाचालकांना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान
औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीने दिलेल्या निवेदनात शहरात रिक्षाचालकांवर प्रवासी सोडण्यासाठी थांबलेले असताना, त्यांच्या विरोधात २८३ अंतर्गत पेालिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कागदपत्राबाबत वाहतूक पोलिसांनी केली. ही कारवाई बंद करावी. रिक्षाचालकांना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करून कंपनीसाठी कामगाराची वाहतूक करणाऱ्या बसमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यांच्यावर संबंधीत विभागाकडून कारवाई होत नसल्याचाही आरोप रिक्षाचालक संघटनांकडून करण्यात आला आहे.
‘आधी स्टँड द्या; मग कारवाई करा’
शहरात रिक्षा चालविण्यासाठी आरटीओ विभागाकडून परवाने दिले जात आहे. मात्र, रिक्षा थांबे निश्चित करण्यात येत नाही. तसेच शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक परवानगी असताना रिक्षा चालकांना प्रवासी सोडण्यासाठी पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात येत नाही. आधी अधिकृत रिक्षा स्टॅँड द्या. त्यानंतर दंडात्मक कारवाई करा.
कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ
दरम्यान, बुधवारी (३० नोव्हेंबर) आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आरटीओ संजय मैत्रेवार यांनी घेतली. या बैठकीत रिक्षा चालकांच्या मागणीनुसार ३० दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेल्या तीन वर्षांपासून रिक्षाचालकांवर कारवाई बंद आहे. यामुळे शहरात बेशिस्तीत वाढलेली आहे. यामुळे रिक्षा विरोधात सुरू असलेली कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट उत्तर आरटीओ विभागाकडून देण्यात आले.
रिक्षाचालक संघटनांनी बंद नाकारला
रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमध्ये रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ भाग घेणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संघटनेमध्येही अनेक रिक्षाचालक संघटना असून त्यांनी पोलिस व आरटीओच्या कारवाईचे समर्थन केले आहे. अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद यांनी दिली.
अतिआवश्यक सेवा सुरू
एक डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनात अत्यावश्यक सेवामधील रिक्षा चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रिक्षाचालक-मालक कृती समितीने जाहीर केले आहे. या रिक्षा वगळता अन्य रिक्षा बंद राहतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे. एक डिसेंबरला रिक्षा बंद असल्याकारणाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षचालकांनी विदयार्थी वाहतूक आज बंद राहणार आहे, असेही पालकांना फोन करून सांगितले आहे.