काय घडलं होतं? कसा झाला घातपात?
महेश चंद्रची पत्नी शालू आणि त्याचा मेहुणा राजू दुचाकीवरून सामोद हनुमान मंदिरात जात होते. त्यावेळी एका कारनं त्यांना धडक दिली. दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. शालूच्या नावानं पती महेशनं दोन कोटींचा विमा काढल्याची माहिती पोलीस हवालदाराला तपासादरम्यान मिळाली. शालू आणि महेश यांचा वाद सुरू असल्याची माहितीदेखील तपासावेळी पुढे आली.
महेश आणि शालूचा वाद पोलीस ठाण्यापर्यंतदेखील पोहोचला. मात्र काही दिवसांपूर्वी महेशनं अचानक शालूशी संवाद सुरू केला. बिघडलेले संबंध पूर्ववत करण्यासाठी त्यानं शालूला सामोद मंदिरात बोलावलं. पतीवर विश्वास ठेऊन शालू तिच्या नातेवाईकांसह सामोद मंदिराकडे निघाली. यावेळी योजनाबद्ध पद्धतीनं महेशनं तिचा काटा काढला. दुचाकीवरून निघालेल्या राजू आणि शालूला एका कारनं धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
दोन कोटींचा विमा आणि पती पत्नीमधील वादाची माहिती मिळाल्यालर पोलिसांनी महेशची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं हत्येची कबुली दिली. विम्याच्या पैशांसाठी महेशनं पत्नीच्या हत्येचा कट रचला. महेशनं पत्नीचा २ कोटींचा विमा काढला. पत्नीच्या हत्येसाठी त्यानं १० लाखांची सुपारी दिली होती. शालूला संपवण्याचा आरोपींचा डाव होता. मात्र त्यात तिचा भाऊदेखील ठार झाला.