मुंबई: इंधन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर जारी केले आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कंपन्यांनी सिलिंडरचे दर कमी केले होते. मात्र यंदा तसं झालेलं नाही. सरकार सिलिंडरचे दर कमी करेल अशी आशा होती. मात्र घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडराच्या दरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकारचे सिलिंडर जुन्याच दरांनी मिळतील.

मुंबईत घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर १ हजार ५२ रुपये इतका आहे. दिल्लीत सिलिंडर १ हजार ५३ रुपयांना, चेन्नईत १ हजार ६८ रुपयांना, तर कोलकात्यात १ हजार ७९ रुपयांना मिळतो. घरगुती वापराचा सिलिंडर १४.२ किलोचा असतो. ६ ऑक्टोबरला या सिलिंडरच्या दरात १५ रुपयांनी वाढ झाली होती. त्याआधी २२ मार्चला सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला होता.
सात हजार कोटींच्या बिस्लेरीवर पाणी का सोडलं? जयंती चौहानांनी एका वाक्यात बरंच काही सांगितलं
दिल्लीत व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा दर १ हजार ७४४ रुपये आहे. मुंबईत व्यावसायिक वापराच्या सिलिंडरसाठी १ हजार ६९६ रुपये मोजावे लागतात. चेन्नईत एलपीजी सिलिंडर १ हजार ८९३ रुपयांना, तर कोलकात्यात १ हजार ८४६ रुपयांना मिळतो. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर ११५ रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्याआधी १ ऑक्टोबरला सिलिंडरच्या दरात ३६ रुपयांपर्यंत कपात केली गेली होती.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलिंडरचे नवे दर जाहीर करतात. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात १ तारखेला बदल होतात. मात्र या महिन्यात दरात बदल झालेले नाहीत. गेल्या महिन्यात व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात कपात केली गेली होती. मात्र यंदा कोणतीच कपात वा वाढ करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here