राजवीर याचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वीच नरेंद्र यांनी त्याला मोबाइल व टॅब घेऊन दिला. अभ्यास संपल्यानंतर तो मोबाइलवर खेळायचा. रविवारी रात्री दीड वाजता तो मोबाइलवर पबजी खेळला. त्यानंतर अखेरची पातळी गाठण्यात त्याला अपयश आले. या दरम्यान त्याने खिडकीला ओढणी बांधली. तोंडावर उशी ठेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्याची आई प्रियंका या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी नरेंद्र यांना जागे केले. नरेंद्र हे हॉलमध्ये आले. राजवीर हा गळफास लावलेला दिसला. नरेंद्र यांनी लगेच त्याच्या गळ्यातील फास काढला. भावाच्या मदतीने राजवीर याला अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राजवीर याला मृत घोषित केले. पबजीच्या वेडापायी त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
समोशासाठी विद्यार्थ्याने घेतला गळफास
समोशासाठी ११ वर्षीय विद्यार्थ्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री गंगानगर येथे उघडकीस आली. विरू नत्थू शाहू असे मृताचे नाव आहे. तो पाचवीत शिकत होता. विरु याचे वडील नत्थू यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. नत्थू यांच्या पत्नी फुलाबाई या गृहिणी आहेत. विरुचा मोठा भाऊ धीरज हा आठवी इयत्तेत शिकतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री विरू याने समोशासाठी फुलाबाई यांच्याकडे पैसे मागितले. फुलाबाई यांनी विरूला दहा रुपये दिले. विरुने हॉटेलमधून समोसा आणला. तो स्वयंपाक घरात ठेवला. हातपाय धुवायला स्नानगृहात गेला. याचवेळी धीरज स्वयंपाक घरात आला. त्याने समोसा खाल्ला. विरू स्नानगृहातून बाहेर आला. समोसा न दिसल्याने त्याने रडायला सुरूवात केली. फुलाबाई यांनी त्याची समजूत घातली. पुन्हा समोसा विकत घेण्यासाठी विरुला पैसे दिले. मात्र विरू खोलीत गेला. पंख्याला साडी बांधून त्याने गळफास घेतला. विरू खोलीतून बाहेर न आल्याने फुलाबाई यांनी दरवाजा ठोठावला. विरू याने प्रतिसाद दिला नाही. खिडकीतून बघितले असता विरू गळफास लावलेला दिसला. फुलाबाई यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमा झाले. गळफास काढून विरू याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून विरुला मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times