मुंबई: भारतीय शेअर बाजारात तेजी कायम असून सेन्सेक्सनं आज, १ डिसेंबर २०२२ रोजी नवा उच्चांक गाठला आहे. डिसेंबरच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजार विक्रमी उच्चांकासह उघडला. बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६७ अंकांच्या उसळीसह ६४,४६७ या सर्वोच्च पातळीवर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ११२ अंकांनी वाढून १८,८७१ वर उघडला. पण बाजारातील तेजी इथेच थांबली नाही, तर गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने ६३,५०० चा टप्पा ओलांडला आणि निफ्टीने १८,८८७ चा ऐतिहासिक स्तरावर पोहोचला.

जबरदस्त कमाईची संधी! टाटा समूहाचा हा शेअर ५२१ रुपयांवर जाण्याची शक्यता, पाहा गुंतवणूकदारांनी काय करावं
अमेरिकन बाजारात हिरवळ आणि आशियाई बाजारपेठेतही झपाट्याने होणे, हे बाजारातील या मोठ्या तेजीचे कारण मानले जात आहे. दुसरीकडे, फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या वक्तव्यानंतर रुपयात मजबूती दिसून येत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ३५ पैशांच्या मजबूतीसह ८१.०७ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे. बुधवारी भारतीय चलन ८१.४२ च्या पातळीवर बंद झाले होते.

अदानींचा NDTV च्या मंडळात प्रवेश, शेअर्सने पकडला रॉकेट स्पीड; एका बातमीने समभागात तुफान उसळी
क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती
बाजारातील या जोरदार तेजीमध्ये बँकिंग, आयटी, फार्मा, मेटल्स, एनर्जी आणि प्रायव्हेट बँक शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर ऑटो, एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्येही घसरण होत असताना मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागही चांगली कामगिरी करत आहेत. सेन्सेक्सच्या ३० पैकी २० शेअर्स वाढीसह आणि १० शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्याच वेळी निफ्टीच्या ५० पैकी २७ समभाग तेजीने उघडले तर २३ समभागात घसरण नोंदवण्यात आली.

झुनझुनवालांच्या स्टॉकची आश्चर्यकारक कामगिरी, शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, काय आहे कारण?
तेजीचे स्टॉक्स
दिवसाच्या सुरुवातीच्या व्यवहारात आज आयटी शेअर्स वाढले आहेत. टेक महिंद्रा २.०१ टक्के, इन्फोसिस २ टक्के, एचसीएल टेक १.७४ टक्के, विप्रो १.७३ टक्के, टीसीएस १.५५ टक्के, एचडीएफसी बँक १.५० टक्के, लार्सन १.२८ टक्के, डॉ. रेड्डी ०.८५ टक्के वाढून तेजीने व्यवहार करत आहेत.

कोणत्या शेअर्समध्ये घसरण
दरम्यान, शेअर बाजारात तेजी असूनही नफावसुली असलेल्या बाजारातील समभागांमध्ये एचयूएल ०.९४ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.६७ टक्के, एशियन पेंट्स ०.४९ टक्के, पॉवर ग्रिड ०.३६ टक्के, मारुती सुझुकी ०.३५ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.१८ टक्क्यांनी, NTPC ०.१५ टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here