नवी दिल्ली: वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला आहे आणि दार महिन्याप्रमाणे यंदाही इंधनाचे दर सुधारित करण्यात आले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या दरांत सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. तर यादरम्यान, १ डिसेंबर २०२२ रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट केल्या आहेत.

पुरवठ्याच्या कमतरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट क्रूड फ्युचर्स ०.०६% वाढून ८७.०२ डॉलर प्रति बॅरल, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड फ्युचर्स ०.२% वाढून ८०.७१ डॉलरवर आले आहे. परिणामी देशांतर्गत तेलाच्या किमतीत काही कपात होण्याची अपेक्षा कमी दिसते. आजही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीसह देशाच्या चारही महानगरांमध्ये आज पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

इंधन कंपन्यांकडून सिलिंडरचे दर अपडेट; तुमच्या खिशाला भार की दिलासा? जाणून घ्या
ऑइल कॉर्पोरेशन इंडियाने सकाळी ६ वाजता जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.७२ रुपये प्रति लीटर आहे तर डिझेलची किंमत ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर १०० रुपयांच्या वर गगनाला भिडले आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात आज पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १०६.३१ रुपये आणि ९४.२७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तसेच चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये आणि डिझेलचा दर ९२.७६ रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड – दररोज इंधनाच्या किमती सुधारतात. व्हॅट, स्थानिक कर आणि मालवाहतूक यासह अनेक घटकांनुसार किंमती बदलत असतात.

प्रमुख शहरातील इंधन दर
१ डिसेंबर रोजी देशातील विविध शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची यादी येथे आहे:

दिल्ली
पेट्रोल: ९६.७२ रुपये प्रति लिटर

डिझेल: ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबई
पेट्रोल: १०६.३१ रुपये प्रति लिटर

डिझेल: ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नई
पेट्रोल: १०२.७४ रुपये प्रति लिटर

डिझेल: ९४.३३ रुपये प्रति लिटर

कोलकाता
पेट्रोल: १०६.०३ रुपये प्रति लिटर

डिझेल: ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसद्वारे किंमत जाणून घ्या
पेट्रोल-डिझेलचे दररोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. ग्राहक एसएमएसद्वारे पेट्रोल-डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड ९२२४९९२२४९ वर एसएमएस करून तर BPCL चे ग्राहक RSP ९२२३११२२२२ वर एसएमएस इंधनाच्या दरांची पाठवून माहिती मिळवू शकतात. तसेच HPCL चे ग्राहक HPPprice ९२२२२०११२२ वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here