Accident News: बिहारच्या सारणमध्ये मंगळवारी रात्री दुचाकींचा अपघात झाला. दोन दुचाकी आमनेसामने धडकल्या. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यातील एका तरुणाचं ४ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. रिसेप्शनच्या सामानाची खरेदी करण्यासाठी तो दुचाकीनं गेला होता.

सारण जिल्ह्यातील पोखरेरा बगही गावात मंगळवारी रात्री दोन भरधाव दुचाकींची धडक झाली. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींचं मोठं नुकसान झालं. अपघातातील जखमींना आसपासच्या लोकांनी पीएचसीमधये दाखल केलं.
डॉक्टरांनी रोशन नावाच्या तरुणाला मृत घोषित केलं. रोशनचा विवाह चार दिवसांपूर्वी म्हणजेच २७ नोव्हेंबरला झाला होता. अपघातात जखमी झालेल्या अन्य तिघांवर डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पाटणा पीएमसीएममध्ये हलवण्यात आलं. त्यापैकी एकाचा बुधवारी मृत्यू झाला. अमित कुमार असं या तरुणाचं नाव आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.