वर्ष २०२२ साठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या पुढील आणि शेवटच्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. बैठकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चलनविषयक धोरण समिती (MPC) व्याजदराबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या पुढील चलनविषयक धोरण समितीच्या ३ दिवसीय बैठकीत व्याजदर ठरवले जाणार आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात गेल्या तीन वेळा वाढ केली आहे. पुढील बैठकीतही व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.
व्याजदरात १.९० टक्क्यांची वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रेपो रेटमध्ये वाढ करण्याबरोबरच सर्व मोठ्या बँकांनी त्यांच्या एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट्स (EBLR) मध्ये १.९० टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ मे २०२२ पासून आतापर्यंत करण्यात आली आहे. मात्र, ठेवींचे व्याजदर अतिशय संथ गतीने वाढवण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी मे पासून प्रमुख अल्प-मुदतीच्या कर्ज दरात (रेपो) १.९० टक्क्यांनी ४ टप्प्यांत वाढ केली आहे.
पुढील महिन्यातही व्याजदर वाढीची शक्यता
रिझर्व्ह बँकेला व्याजदरांबाबत शिफारशी चलनविषयक धोरण समिती करते. समितीच्या पुढील बैठकीत रेपो दरात आणखी वाढीची शक्यता आहे.
दरवाढीची शक्यता
रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन चालनविषयक बैठकांनंतर घोषित केलेल्या ५० बेस पॉईंट्सवरून सुमारे ३५ बेस पॉईंटने आपला दरवाढ करेल, असे बहुतेक अर्थशास्त्रज्ञांना अपेक्षित असल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे. दरम्यान, CII ने २५-३५ बेस ओळींत दर वाढ सुचवली आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्राहक महागाई ७ टक्केच्या च्या खाली आल्यानंतर कमी दरात वाढ अपेक्षित आहे.