south korean youtuber sexually harassed in mumbai: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खारमध्ये एका कोरियन यूट्यूबर तरुणीसोबत दोन तरुणांनी गैरवर्तन केलं. तरुणांनी भररस्त्यात तरुणीचा विनयभंग केला. तरुणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर खार पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आणि कलम ३५४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

 

mumbai crime
मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील खारमध्ये एका कोरियन यूट्यूबर तरुणीसोबत दोन तरुणांनी गैरवर्तन केलं. तरुणांनी भररस्त्यात तरुणीचा विनयभंग केला. तरुणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर खार पोलिसांनी स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आणि कलम ३५४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुरुवारी पहाटे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. चांद मोहम्मद (१९) आणि मोहम्मद नकीब अन्सारी (२०) अशी आरोपींची नावं आहेत.

कोरियन महिला यूट्यूबरसोबत छेडछाडीची घटना २९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडली. घटनेच्या वेळी तरुणी खार परिसरात लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. व्हिडीओमध्ये एक तरुण दक्षिण कोरियन तरुणीच्या अतिशय जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरुणी त्याला विरोध करते. मात्र तरीही तो तिचा हात खेचतो. तरुणीला वारंवार त्याच्या स्कूटरवर बसण्यास सांगतो. तो तिच्या अतिशय जवळ जाऊन चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो. यानंतर तरुणी तिथून निघून जाऊ लागते.

अंगचटीला येणाऱ्या तरुणाला विरोध करत तरुणी तिथून निघते. आता मला घरी जावं लागेल, असं म्हणत तरुणी भरभर पावलं टाकू लागते. कोरियन तरुणी निघून जात असताना दोन आरोपी तरुण स्कूटरवरून तिचा पाठलाग करतात. आमच्यासोबत चल असं म्हणतात. यादरम्यान तिच्याशी जबरदस्तीदेखील करतात. तरुणी कशीबशी या परिस्थितीतून स्वत:ची सुटका करते. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेतली. यानंतर दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here