जळगाव : पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाळे येथे पुतण्याचा बैल शेतात शिरल्याच्या रागातून काकाने पुतण्याच्या डोक्यात काठीने वार केल्याची घटना घडली होती. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या पुतण्याचा काल बुधवारी जळगावातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. पुनमचंद भावराव भोसले (वय ४८) असे मृत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

(वाडी शेवाळे ता. पाचोरा) येथील प्रल्हाद मोतीराम भोसले व त्याचा पुतण्या पुनमचंद भोसले यांची शेजारी शेजारी शेतजमीन आहे. पुनमचंद भावराव भोसले यांची बैलजोडी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्या शेतात शिरली. याचा राग मनात धरुन प्रल्हाद भोसले व त्यांचा मुलगा गणेश भोसले याने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला. यामुळे पुनमचंद हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ३० नोव्हेंबरला काल सकाळी १० वाजता पुनमचंद भोसले यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

रवींद्र जाडेजाचा मास्टरस्ट्रोक, प्रचार बायकोचा, गोडवे मोदींचे, व्हिडीओ मात्र बाळासाहेबांचा
या प्रकरणी मयत पुनमचंद यांचा मुलगा किरण पुनमचंद भोसले यांच्या तक्रारीवरून प्रल्हाद मोतीराम भोसले व त्यांचा मुलगा गणेश भोसले यांच्याविरुध्द पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. साहाय्यक फौजदार रविंद्र पाटील, किरण ब्राह्मणे, अरुण राजपूत या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाडी येथे जाऊन गणेश भोसले याला ताब्यात घेत अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.

Share Market Opening: शेअर बाजारात धूम; सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड, निफ्टीमध्येही तेजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here