New packaging Rules: दूध, चहा, बिस्किट्स, खाद्यतेल, पीठ, बाटलीबंद पाणी, बेबी फूड, डाळी, तृणधान्य, सिमेंट बॅग, ब्रेड आदी उत्पादनांची पॅकेटवर पूर्ण माहिती असणे बंधनकारक असणार आहे. ही नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार होती, पण सरकारने आता नवीन तारीख निश्चित केली आहे. एखाद्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग तारीख त्या उत्पादनाच्या निर्माणाची तारीख दर्शवते.

 

New Food Packaging Rules
नवी दिल्ली: एका महिन्यात तुम्ही नवीन वर्षात पदार्पण करणार आहात. नवीन वर्षापासून तुम्हाला अनेक उत्पादनांच्या पॅकेटवर बदल निदर्शनास येतील. सरकार १ जानेवारी २०२३ पासून पॅकेजिंगसाठी नवीन नियमावली लागू करणार आहे. ही नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार होती, पण सरकारने आता नवीन तारीख निश्चित केली आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्य़ा नियमावली नुसार कंपन्यांना आता १९ प्रकारच्या उत्पादनांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती द्यावी लागेल. यामध्ये दूध, चहा, बिस्किट, खाद्यतेल, आटा, बाटलीबंद पाणी, बेबी फूड, डाळी, तृणधान्ये, सिमेंटच्या पिशव्या, ब्रेड आणि डिटर्जंट आदी उत्पादनांचा सामावेश आहे. या उत्पादनांच्या पॅकेटवर उत्पादनाची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक असेल. जर सामान आयात केलेला असेल तर, उत्पादनावर तयार केल्याची तारीख, कोणत्या देशात तयार झाले? याबाबत तपशील देणे कंपन्यांना गरजेचे असेल.

सर्वसामान्यांच्या खिशावर भार; जीएसटी लागू झाल्यानंतर पॅकेटबंद उत्पादनांची वाढ
मंत्रालयाने अधिसूचना केली जारी
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने पॅकेजिंगच्या नवीन नियमाबाबत अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सध्या कंपन्यांना तयारीसाठी एक महिन्याचा अवधी मिळाला आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रकारे दिलासा देणारी बातमी आहे. जर पॅकेज केलेल्या वस्तूचे वजन प्रमाणापेक्षा कमी असेल, तर प्रति ग्रॅम किंवा प्रति मिलीलीटर किंमत देखील लिहावी लागेल. पॅकेजिंगचे नवीन नियम एका पॅकेटमध्ये १ किलोपेक्षा जास्त माल असल्यास त्याची किंमत १ किलो किंवा १ लिटरनुसार लिहिणे आवश्यक करण्यात आले आहे.

पॅकेटबंद पदार्थांवर दरवाढीचा भार;दूध, ताक, दही महागले; उपवासाच्या पदार्थांनाही झळ
कंपन्यांना हे स्वातंत्र्य असेल
अनेक उत्पादनांमध्ये अनेकदा असे दिसून येते की, कंपन्या किमती आकर्षक करण्यासाठी कमी वजनाचे पॅकेट बाजारात आणतात. कंपन्यांना नवीन पॅकेजिंग नियमांनंतर पूर्ण स्वातंत्र्य असेल की ते बाजारात विकत असलेल्या पॅकेज केलेल्या वस्तूंचे प्रमाण ठरवू शकतील. एखाद्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग तारीख त्या उत्पादनाच्या निर्माणाची तारीख दर्शवते. म्हणजेच ज्या वस्तूवर ही तारीख लिहिली आहे ती त्या दिवसाची तारीख होती जेव्हा ती पॅक केली जात होती.

उत्पादन तारखेचे फायदे
कोणत्याही उत्पादनाच्या पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिल्यामुळे ग्राहकांना योग्य वस्तू घेता येईल. जर दुकानदार खूप जुनी वस्तू विकत असेल तर अशा वेळी ग्राहकांना ते सहज नाकारता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here