Pune News : पुण्यावरून हैदराबादला निघालेल्या भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरची खांडज गावातील एका शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरुष तर एक महिला प्रवासी प्रवास करत होते.

दरम्यान, त्या ठिकाणी नक्की काय झालं आहे? याची योग्य ती माहिती लोकांना मिळाली नसल्याने काही काळ अफवा पसरल्या होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार, हे वायुदलाचे हेलिकॉप्टर असून खांडस गावातील शेतात हेलिकॉप्टर उतरल्यानंतर माळेगाव पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त पुरवला आहे. वायुदलाचे अधिकारीही या ठिकाणी पोहचले आहेत.
इकडे जा, तिकडे जा! तोडफोड करण्यामध्ये सरकारचं लक्ष अधिक, खैरेंचा सरकारवर हल्लाबोल
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.