नवी दिल्ली: भारतात आता लोकांना खिशात नव्हे तर थेट पेमेंट वॉलेटमध्ये पैसे ठेवून फिरू शकणार आणि ते आज म्हणजे १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वर्षाखेरच्या पहिल्या दिवशी रिझर्व्ह बँक (आरबीआय) किरकोळ वापरकर्त्यांसाठी डिजिटल रुपया लाँच करणार आहे. डिजिटल रुपया लाँच झाल्यानंतर सर्वसामान्यांना खिशात रोख ठेवण्याची गरज भासणार नाही आणि सध्याच्या नोटांप्रमाणे परंतु डिजिटल पद्धतीने व्यवहार करू शकतील. ई-रुपी डिजिटल टोकनप्रमाणे काम करेल. पायलट प्रोजेक्ट दरम्यान किरकोळ डिजिटल रुपयाचे वितरण, वापर आणि तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची कसून चाचणी केली जाईल.

रिझर्व्ह बँकेच्या या डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) असे नाव देण्यात आले आहे. पण डिजिटल रुपयाचे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच घुमत असेल की आता हे सुरू होत असेल तर पेटीएम, गुगल पे आणि फोन पेचे काय होईल?

१ डिसेंबरपासून येणार डिजिटल रुपया; RBI ने मोठी घोषणा ; जाणून घ्या या चलनाबाबत संपूर्ण माहिती
UPI आणि डिजिटल रुपयामधील फरक

आजच्या काळात आपण कोणत्याही दुकानात सर्व प्रकारच्या UPI द्वारे पेमेंट करतो पण याला डिजिटल चलन म्हणता येणार नाही. कारण UPI द्वारे हस्तांतरित केलेले पैसे केवळ भौतिक चलनाद्वारे चालतात. म्हणजेच युपीआय पेमेंटसाठी वापरले जाणारे चलन सध्याच्या भौतिक चलनाच्या समतुल्य आहे. डिजिटल रूपी हेच अंतर्निहित पेमेंट असेल, जे चलनाऐवजी डिजिटल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते.

Modi@8: मोदी सरकारचे ८ वर्ष, ‘या’ महत्त्वाच्या निर्णयांमुळे घडली ‘डिजिटल क्रांती’

रिझर्व्ह बँकेने जारी केलेला ई-रुपी डिजिटल टोकन म्हणून काम करेल. सोप्प्या शब्दांत बोलायचे तर सीबीडीसी हे रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केलेल्या चलनी नोटांचे डिजिटल स्वरूप आहे. आता युपीआय आणि डिजिटल रुपयामधील आणखी एक फरक समजून घ्या. युपीआय पेमेंट म्हणजे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात थेट पैसा ट्रान्सफर करणे. पायलट प्रोजेक्टमध्ये सहभागी असलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटद्वारे त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे रिझर्व्ह बँकेने डिजिटल रुपयाबाबत म्हटले आहे. युपीआय वेगवेगळ्या बँका हाताळतात आणि या बँका रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली काम करतात.

डिजिटल रुपया म्हणजे काय?
पण तुमचा डिजिटल रुपया थेट रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे हाताळला जाईल आणि त्यावर नजर ठेवली जाईल. त्याच्या वितरणात उर्वरित बँकांचा सहभाग असेल. म्हणजे दाराचे हॅन्डल आरबीआयच्या हातात असेल.

‘ई-रुपी’चे मोठे फायदे

  • डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी उपयुक्त.
  • लोकांना खिशात रोख रक्कम ठेवण्याची गरज भासणार नाही.
  • मोबाईल वॉलेटप्रमाणेच पेमेंट करण्याची सुविधा असेल.
  • तुम्ही डिजीटल रुपयाला बँक मनी आणि कॅशमध्ये सहज रुपांतरीत करू शकता.
  • परदेशात पैसे पाठवण्याच्या खर्चात कपात होईल.
  • इंटरनेट कनेक्शन नसतानाही ई-रुपी काम करेल.
  • ई-रुपयाचे मूल्यही सध्याच्या चलनाइतकेच असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here