vomit of whale fish is valuable than gold: व्हेल माशाच्या उलटीला शास्त्रीय भाषेत एम्बरग्रीस म्हणतात. व्हेलच्या आतड्यांमधून एम्बरग्रीस बाहेर पडतं. व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचं अन्न खातो. काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचं अन्न पचत नाही. तेव्हा तो उलटी करतो. त्यालाच एम्बरग्रीस म्हटलं जातं. बाजारात या उलटीला कोटींचा भाव मिळतो. त्यामुळेच तिची तस्करी वाढली आहे.

समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेलची उलटी चिकट बनते. ती मेणासारखी दिसते. तिचं वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर परफ्युम तयार करताना होतो. परफ्युमची निर्मिती करणाऱ्या कंपन्या उलटीचा वापर करतात. परफ्युम शरीराला लावण्यासाठी उलटीतील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. याचमुळे परफ्युम दीर्घकाळ टिकतात. परफ्युम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात.
व्हेलच्या उलटीचा वापर सुगंधित धूप आणि अगरबत्तीमध्येही होतो. एम्बरग्रिसचा तुकडा सोबत ठेवल्यास प्लेग रोखण्यात मदत होते असं युरोपियन लोक मानतात. औषधांमध्येही व्हेलच्या माशाचा उलटीचा वापर केला जातो. सेक्सशी संबंधित आजारांवरील उपचारांतही वापर करण्यात येतो. त्यामुळेच व्हेलच्या उलटीला बाजारात कोटींचा भाव मिळतो. व्हेल मासे समुद्र किनाऱ्यांपासून फार लांब असतात. त्यामुळे त्यांची उलटी किनाऱ्यांवर येण्यासाठी बराच कालावधी लागतो. व्हेल माशाच्या उलटीला असलेली किंमत खूप असल्यानं तिला ‘तरंगतं सोनं’ असंही म्हटलं जातं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.