नवी दिल्ली: टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे अकाली निधन भारतीय उद्योग विश्वासाठी मोठे नुकसानदायक आहे. भारतातील ऑटोमोबाईल उद्योगातील दिग्गज कार्यकारी अधिकारी आणि देशातील टोयोटाचा चेहरा मानले जाणारे विक्रम किर्लोस्कर यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विक्रम किर्लोस्कर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टोयोटा इंडियाने पुष्टी केली
टोयोटा इंडियाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनाची दुःखद माहिती दिली. टोयोटाने या संदर्भात पोस्ट करत लिहिले की, “टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे २९ नोव्हेंबर २०२२ रोजी अकाली निधन झाले आणि आम्हाला याचे खूप दुःख झाले आहे.” किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता हेब्बल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोण आहेत मानसी किर्लोस्कर; वडिलांच्या निधनानंतर टाटांच्या सूनेला संभाळायचा आहे ५०० कोटींचा व्यवसाय
एसयूव्ही कार भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचवली
विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे उद्योगपती होते. सायकल विक्री, दुरुस्ती आणि चालवण्याद्वारे सुरू केलेली कंपनी आज देशाला अस्सल SUV वाहने देणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. किर्लोस्कर यांनी टोयोटा कार भारतात आणली होती, असे ६४ वर्षीय विक्रमबद्दल असे म्हटले जाते. देशात एसयूव्हीच्या नावावर टाटाच्या सफारी आणि सिएरा सारखी दोन-तीन वाहने बाजारात असताना विक्रमने भारताला एसयूव्ही वाहनांची ओळख करून दिली.

टाटांचे व्याही, भारतीय ऑटो क्षेत्रातील अग्रणी, विक्रम किर्लोस्कर प्रसिद्धीपासून चार हात लांबच
एकामागून एक अप्रतिम गाड्यांची लाईन
१९९९ मध्ये देशातील बजेट कारच्या काळात विक्रमने लोकांना अशा एसयूव्हीशी ओळख करून दिली, जी प्रत्येक चालकाला आवडली. ही गाडी क्वालिस होती. या गाडीच्या गुणवत्तेमुळे, एक वेळ अशी आली जेव्हा क्वालिस हे देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक बनले. यामागे विक्रम स्वतः कारणीभूत होते. यामागचे कारण म्हणजे त्यांची व्यवसायाची कल्पना आणि विपणन धोरणामुळे क्वालिसला फॅमिली कार म्हणून स्थान दिले आणि लोकांना ते आवडले.

क्वालिस ज्याप्रकारे यशस्वी ठरले, त्यामुळे त्याचे उत्पादन वाढायला हवे होते, पण अगदी उलट घडले. एके दिवशी अचानक कंपनीने त्याचे उत्पादन बंद केले आणि रातोरात शोरूममधून वाहनांची विक्री सुरू झाली. पण हे सुद्धा बहुधा एका योजने अंतर्गत होते कारण यानंतर २००५ मध्ये इनोव्हा बाजारात आली. आणि या वाहनाची यशोगाथा कोणापासून लपलेली नाही. २००७ मध्ये इनोव्हाने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले आणि कंपनीने ५,००० पेक्षा अधिक गाड्या विकल्या.

‘टोयोटा’ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन
यानंतर, २००९ मध्ये कंपनीने जी कार देशासमोर आणली, तिचा अभिमान आजही सर्वच बाळगत आहे. फॉर्च्युनर हे डिझाईन, भक्कम रस्त्याची उपस्थिती आणि अप्रतिम कामगिरीच्या दृष्टीने अंतिम वाहन होते. सध्या लोक फॉर्च्युनरच्या चौथ्या जेनरेशनची वाट पाहत आहेत, पण त्याआधीच विक्रम यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात त्यांची मुलगी मानसी व्यवसायाची वारसरदार आहे.

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर
आज मनुष्य चंद्रापर्यंत पोहोचला असला तरी पण एक काळ असा होता की सायकल ही माणसांसाठी एखाद्या आश्चर्याची गोष्ट होती. अशा परिस्थितीत जेव्हा किर्लोस्करांनी आयुष्यात पहिल्यांदा सायकल चालवणारी व्यक्ती पाहिली तेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या मनात एक विचार आला. या कल्पनेचे अनुसरण करून त्यांनी त्यांचे भाऊ रामुआण्णा यांच्यासोबत १८८८ मध्ये ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ नावाचे सायकलचे दुकान उघडले. सायकल विकण्यासोबतच ते दुरुस्त करायचे आणि लोकांना सायकल चालवायला शिकवायचे. लक्ष्मणराव किर्लोस्कर हे विक्रम किर्लोस्करांचे पणजोबा होते. अशाप्रकारे पणजोबांनी सायकलपासून व्यवसायाची सुरुवात केली ज्याचे विक्रम यांनी मोठ्या उद्योगात रूपांतर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here