जळगाव : शेतातील मक्याचा चारा आणण्यासाठी निघालेला ट्रॅक्टर पलटी होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ट्रॅक्टर ट्रॉलीत बसलेल्या चार तरुणांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात घडली आहे. योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे (वय-२०, रा. अंबे ता. शिरपूर, जि. धुळे) असं मृत तरूणाचं नाव आहे. या अपघातात इतर तीन तरुण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती शी की, योगेश सैंदाणे हा एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे मामाच्या गावी कामानिमित्त आला होता. बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी योगेश सैंदाणे हा नागदुली गावातील रविंद्र अभिमन कोळी यांच्या शेतातील मक्याचा चारा भरण्यासाठी उदेश गोविंदा कोळी, खुशाल राजू माळी यांच्यासोबत ट्रॅक्टर (एमएच १९ डीव्ही २६७१) ने सकाळी १० वाजता जात होता. त्यावेळी ट्रॅक्टर रविंद्र कोळी चालवत होते, तर अन्य चार जण ट्रॉलीत बसले होते.

Pune Baramati : वायूदलाच्या हेलिकॉप्टरचं बारामतीत इमर्जन्सी लँडिंग, आटोळेंच्या शेतात ‘चेतक’ उतरलं

सुकेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅक्टर चालक रविंद्र कोळी यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट पाटचारीत पलटी झाला. या अपघातात योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या खाली दाबला गेला. त्याला तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. तर ट्रॅक्टर चालक रविंद्र कोळी, उदेश कोळी, खुशाल माळी हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here