हा व्हिडिओ २० जुलै रोजी शेअर करण्यात आला. तेव्हापासून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकातील बेल्लारी कोविड केअर सेंटरचा आहे. या सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर रूग्णांना किती आनंद झाला असावा हे ते ज्या प्रकारे नृत्य करत आहेत, त्यावरून सहज लक्षात येऊ शकते.
हा व्हिडिओ प्रसिध्द झाल्यापासून व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच या व्हिडिओवर ५०० हून अधिक रिट्विट केला गेला आहे. तसेच या व्हिडिओला आतापर्यंत आणि २ हजाराहून अधिक लाईक्स पाहिल्या मिळत आहेत आणि ही बातमी लिहून ती प्रसिद्ध होई पर्यंत हा आकडा आणखी पुढे गेला असेल हे नक्की.
वाचा:
वाचा:
हा व्हिडिओ इतका का लाइक केला जात आहे? याचे एक कारण म्हणजे एकीकडे कोरोना विषाणूचा ज्या प्रकारे संसर्ग होत आहे तो पाहता लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे या आजारापासून बरे झाल्यानंतर नक्कीच एक मोठी आणि कठीण लढाई जिंकल्याची या आजारातून बरे झालेल्या लोकांना वाटणे साहजिकच आहे. या कारणांमुळेच बरे झालेले रुग्ण अशा प्रकारे उत्सव साजरे करताना दिसत आहेत. करोनाबाधित रुग्णांचे ही विजयाचे क्षण लोकांना बघायला फार आवडत आहेत.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट लोकांना नक्कीच वाटत असेल. ती म्हणजे विषाणूला घाबरून जाण्याची काहीच आवश्यकता नाही. त्याऐवजी काही मिनिटांसाठी हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times