shivaji maharaj mangal prabhat lodha controversy, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, लोढांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची – kolhapur the demand of shiv sainiks file case against mangal prabhat lodha there ruckus between the police and shiv sainiks
कोल्हापूर : महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्यानंतर राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली आहे. वारंवार या सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असल्याने आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे म्हणत लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेत नसल्याने यावेळी येथे हायव्होल्टेज ड्रामा देखील पहायला मिळाला.
पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे रविकरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक आले. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पीआय कटकधोंड यांना निवेदन देत जिल्हा प्रमुखांनी तक्रार नोंद करण्याची मागणी केली. बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली, ४८ हजार वर्षांपूर्वीचा Zombie व्हायरस पुन्हा जिवंत मात्र, तक्रार नोंद न करता निवेदनाची पोच देण्यास पोलिसांनी तयारी दर्शवली यामुळे येथे शिवसैनिक आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आणि पोलीस स्टेशन बाहेरच घोषणाबाजी करत मंगल प्रभात लोढा आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आज राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांना भेटून सदर निवेदन देण्यास दोन्ही जिल्हाप्रमुख व शिवसैनिक हे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे रवाना होत होते.
मात्र, शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांनी मध्यस्थी करत सदर तक्रार नोंद करून घेत सातारा पोलिसांकडे वर्ग करण्यास सांगितले. मात्र, यावरून येत्या काळात मंगल प्रभात लोढा, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आधी प्रकाश आंबेडकर-रामदास आठवलेंना शिवीगाळ, आता माजी महापौराने थेट पोलिसांच्याच अंगावर घातली गाडी