नाशिक : काही दिवसांपूर्वी भर दिवसा धारदार हत्याराने वडापाव विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. दरम्यान, आता हे हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले असून नाशिक पोलिसांनी त्यांना चांगलाच चोप दिला आहे. गेल्या आठवड्यात मद्यधुंद टोळक्याने वडापावच्या गाडीवर धुडगूस घातला होता. कोयत्याचा नंगानाच करत विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला होता. हे हल्लेखोर आता पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

हल्ल्यांनंतर ताब्यात आलेल्या संशयितांची नाशिक रोड पोलिसांनी धिंड काढली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी कोयत्याने हल्ला केला होता, त्याच ठिकाणी संशयितांना चोप देत टवाळखोरांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. त्यासोबतच चोप देतानाचा व्हिडीओ देखील आता समोर आला असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अजित आगरकर नव्हे तर हा जलद गोलंदाज होणार टीम इंडियाच्या निवड समितीचा प्रमुख; कारण फक्त एकच…
वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या सत्रात भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी एका वडापाव विक्रेत्यावर हल्ला केल्याची (Attack on a vada pav seller in Nashik) घटना समोर आली होती. विशाल गोसावी या वडापाव विक्रेत्यावर टवाळक्याकडून हल्ला करण्यात (Vadapav seller attacked by mob) आला होता. शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरात ही घटना घडली असून भर दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करण्यात आला (Assault with Koyta and other sharp weapons) होता. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली होती. भरदिवसा धारदार शस्त्रांचा नंगानाच करत या टवाळक्याने पोलिसांना आवाहन दिलं होतं.

आधीचा व्हिडिओ :

नाशिक रोड परिसरातील या घटनेचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये गाडीवर एक टोळके अचानक येऊन वडापाव विक्रेत्यावर कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करताना दिसून येईल. हल्लेखोरांनी गाड्यावर असलेले सामान रस्त्यावर फेकतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले होते. हल्ला होताच वडापावच्या गाड्याजवळ असलेले नागरिक भयभीत झाले आणि त्यांनी तेथून पळ काढला. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याठिकाणी उपस्थित अजून एका व्यक्तीवरही हल्ला केला आणि गाडीवर बसून त्या ठिकाणहून पळ काढला.

जुन्या वादातून वडापाव विक्रेत्यावर हल्ला (Attack on vada pav seller due to old dispute) झाल्याची माहिती समोर आली होती. कोयता आणि इतर धारधार हत्याराने हल्ला करत भर रस्त्यावर दहशत माजावण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला. या हल्ल्यात एकजण जखमी झाला होता. दरम्यान, पोलिसांनी या संशयित हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. भर दिवसा, भर गर्दीत त्याच जागेवर त्यांची धिंड काढत चांगलाच धडा शिकवला आहे. यामुळे टवाळखोरांवर वचक बसण्यास मदत होईल, असं म्हटलं जात आहे.

Mumbai Airport: मोठी बातमी : मुंबई विमानतळावरील सर्व व्यवहार अचानक ठप्प, कारण अस्पष्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here