पुणे (आंबेगाव) : पुण्यातील आंबेगाव येथे अंगणात बसलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला करत मान पकडली. यावेळी कुत्र्यानेही बिबट्यावर प्रतिहल्ला केला. काहीच वेळात कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडला आणि बिबट्याने पळ काढला हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि खेड तालुक्यात बिबट्यांचे लोकवस्ती लगत वाढते वास्तव्य दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. जंगले कमी होऊ लागल्याने जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यातच बिबट्या तर सर्रास नागरिकांच्या घराकडे येत आहेत. प्राण्यांवर, माणसांवर हल्ले करत आहेत. या हल्यात माणसाला आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

क्रिकेटमध्ये कोणालाही करता आला नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडच्या विक्रमात पाकची लाज गेली
त्यादरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे. जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर पाठीमागून बिबट्याने हल्ला करत मान पकडली. काहीच वेळात कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडला आणि बिबट्याने पळ काढला हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील माणिकडोह या ठिकाणी बिबट्या निवारण केंद्र आहे. अनेकदा पकडलेले बिबटे ते या ठीकणी सोडले जातात. बिबटे लपण्यासाठी अनेकदा उसाच्या शेताचा वापर करतात. शिकार करायची म्हटली तरी दबा धरून त्या शिकारीवर हल्ला करता येतो. आता या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी सुरू असल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा देखील नाही. त्यामुळे बिबट्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल सुरू आहे.

बिबट्या अनेकदा शिकारीसाठी दबा धरून बसतात. शिकार समोर आली की त्यांच्यावर हल्ला चढवत त्याची शिकर करतात. अनेकजण या हल्ल्यात जखमी देखील होतात. चांडोलीच्या घटनेने बिबट्याचा हल्ला कसा असतो याचा प्रत्यय आपल्या प्रत्येकाला आला असावा. रात्रीच्या अंधारात बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत दाखल होऊन नागरिकांचे रक्षण करणाऱ्या कुत्र्याला भक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळत आहेत. या भागात पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आधी वडापाव विक्रेत्यावर हल्ला; नंतर त्याच जागेवर पोलिसांनी हल्लेखोरांना धू-धू धुतलं; Video व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here