सांगली: ‘जयंत पाटील यांना लोकांनी निवडून दिले. मला थेट आमदारांनी निवडून दिले. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मला का बोलवले नाही? विधान परिषदेच्या आमदारांना बैठकीला बोलवण्याचे पालकमंत्री यांच्यात धारिष्ट्य नाही काय?’ असा सवाल आमदार यांनी उपस्थित केला. दूध दर आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ( questions to )

वाचा:

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने विधान परिषदेचे आमदार नाराज झाले आहेत. आमदार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, ‘जयंत पाटील यांना एक लाख लोकांनी निवडून दिले. जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी मला निवडून दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आल्यावरच मला आढावा बैठक असल्याचे समजले. मला बैठकीला का बोलवले नाही माहीत नाही, पण महत्त्वाच्या बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषद आमदार असा भेदभाव करणे योग्य नाही. पालकमंत्री पाटील यांच्यात विरोधी पक्षांच्या आमदारांना बैठकीला बोलवण्याचे धारिष्ट्य नाही काय? त्यांनी करोना संकटावरून राजकारण करू नये.’

वाचा:

आमदार सदाभाऊ खोत यांनीही बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आता आमदार पडळकरांनी थेट पालकमंत्री पाटील यांच्यावरच निशाणा साधल्याने जिल्ह्यात येणाऱ्या काळात पालकमंत्री पाटील आणि आमदार पडळकर यांच्यात सामना रंगण्याचे संकेत मिळाले आहेत.

सांगलीत पुन्हा लॉकडाऊन

सांगली जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात बुधवारी (ता. २२) रात्रीपासून ते ३० जुलैच्या रात्रीपर्यंत म्हणजे आठ दिवसांचा लॉकडाऊन होणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून, ग्रामीण भागात लोकांनी जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. ‘गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. समूह संसर्ग टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. २२ जुलैच्या रात्रीपासून ते ३० जुलैपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रात लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी होईल. ग्रामीण भागातील लोकांनी स्वतःहून जनता कर्फ्यूचे पालन करावे. रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये मात्र लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी’, असे पाटील यांनी सांगितले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here