भुवनेश्वर: ओदिशाच्या बालासोरमध्ये एका वडिलांचा निष्काळजीपणा चिमुकल्या मुलाच्या जीवावर बेतला आहे. दीड वर्षांच्या मुलाचा डिझेल प्यायल्यानं मृत्यू झाला. चिमुकल्यानं पाणी समजून पाणी तोंडाला लावली. मात्र त्यात डिझेल होतं. डिझेल प्यायल्यानं मुलाची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

बालसोरमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी मुलाचे वडील वाहन दुरुस्त करत होते. जवळच डिझेलची बाटली होती. खेळता खेळता दीड वर्षांचा लेक तिथे आला. बाटलीत पाणी असल्याचं समजून त्यानं ती तोंडाला लावली. डिझेल पोटात गेल्यानं मुलाची तब्येत बिघडली.
झालं गेलं विसरू! पतीचा पत्नीला शब्द, पण मंदिरात जाताना अप’घात’ झाला; मामला २ कोटींचा निघाला
मुलाला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी हात वर केले आणि मुलाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. यानंतर मुलाला भुवनेश्वर एम्समध्ये नेण्यात आलं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे मुलानं अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे.

मुलाच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं. मुलाच्या वडिलांनी डिझेलची बाटली खालीच ठेवली होती. त्यांचं लक्ष नसताना मुलानं पाणी समजून बाटली तोंडाला लावली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पालकांनी सजग असायला हवं आणि असे प्रकार टाळायला हवेत, असं डॉक्टर म्हणाले.
हृदयद्रावक! रिसेप्शनच्या दिवशीच तरुणाचा मृत्यू; तीन दिवसांपूर्वी झाला होता प्रेम विवाह
पश्चिम बंगालमध्येही असाच प्रकार
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्येही अशाच प्रकारच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. खासदार अबू ताहेर खान यांच्या कारखाली एक मुलगा आला. खासदारांच्या वाहनांचा ताफा जात असताना रस्त्याशेजारी खेळत असलेला मुलगा रस्त्यावर आला. कारनं त्याला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here