मुंबई- ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नेटकऱ्यांना तर कधी एकदा त्यांना नवरा आणि नवरीच्या वेशात पाहतोय असं झालंय. आता त्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. आज हार्दिक आणि अक्षया यांच्या डोईवर अक्षता पडणार आहेत. त्यांच्या लग्नातील फर्स्ट लूक आता समोर आला आहे. यात अक्षया आणि हार्दिक दोघेही अगदी राजेशाही थाटात सजलेले दिसत आहेत. अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नविधींना अखेर सुरुवात झाली आहे.


हार्दिक आणि अक्षया यांच्या हळदी आणि मेहंदीच्या फोटोंनी सोशल मीडियावर एकच धुमाकूळ घातला होता. त्यांच्या हळदीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झाले. अखेर आता लवकरच ते दोघे सप्तपदी चालणार आहेत. त्यापूर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. त्यांचा पहिला लूकही आता समोर आला आहे. यात अक्षयाने राणी कलरची नऊवारी परिधान केली आहे. या नऊवारीवर चंद्राकोर आहे. तिने गळ्यात अनेक राजेशाही थाट असलेले दागिने परिधान केले आहेत. मोठाली ठुशी, चंद्रहार, नाकात नथ यात अक्षया खूप सुंदर दिसत आहे. तिच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोतही दिसत आहे. तर हार्दिकने सोनेरी रंगाचा अंगरखा परिधान केला आहे. त्यावर अक्षयाच्या साडीसोबत जुळणारी शाल घेतली आहे. गळ्यात भलीमोठी रुद्राक्षांची माळ घातली आहे. दोघांच्याही डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या आहेत.

hardeek and akshaya

अगदी पेशवाई थाटात ते दोघेही यज्ञासमोर बसले आहेत. त्यांचे हे फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. लवकरच त्यांची सप्तपदी आणि वरमालाही पार पडणार आहे. अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता अक्षया आणि हार्दिक लग्नबंधनात अडकणार आहेत.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here