नवी दिल्ली: देशातील दोन मोठे उद्योगपती – गौतम अदानी आणि मुकेश अंबानी – यांच्या मालमत्तेबाबत कोण पुढे आणि कोण मागे अनेकदा चर्चा होत असते. सध्याच्या आकळत अदानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, पण हुरून इंडियाच्या एका यादीत अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अदानी समूहाच्या कंपन्यांना मागे टाकले आहे. या यादीत जिथे रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे, तर अदानीच्या कंपन्या टॉप-१० यादीत सर्वात तळाशी आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीज यादीत अग्रणी
हुरुन इंडियाने गुरुवारी २०२२ साठी ‘बरगंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया ५००’ यादी जारी केली. या यादीत देशातील ५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांचा समावेश करण्यात आला असून या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्य १७.२ लाख कोटी रुपये आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३.६ टक्क्यांनी वाढले आहे.

बाजाराच्या तेजीत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना बंपर फायदा, अवघ्या काही तासांत झाला ६२ हजार कोटींचा फायदा
पहिल्या १० कंपन्यांचे मूल्य
‘२०२२ बरगंडी प्रायव्हेट हुरून ५००’च्या पहिल्या १० कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे एकूण मूल्य अंदाजे २२६ लाख कोटी रुपये आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने मूल्यांकन सर्वाधिक असून दुसऱ्या स्थानावर असलेल्या टीसीएसचे मूल्य ११.६८ लाख कोटी रुपये आहे.

टीसीएस, HDFC बँकही चमकली
या यादीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने दुसरे स्थान पटकावले असून कंपनीचे मूल्य अंदाजे ११.६ लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची किंमत अंदाजे ८.३ लाख कोटी रुपये आहे. याशिवाय, इन्फोसिस या यादीत ६.४ लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह चौथ्या आणि ICICI बँक ६.३ लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह पाचव्या स्थानावर आहे.

३ स्टेप्स, परफेक्ट यशाचा मंत्र! मुकेश अंबानींनी सांगितलेली ही सूत्रे वापरा नक्की यशस्वी व्हाल
अदानींच्या कंपन्या तळाला
याशिवाय भारतातील पहिल्या १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत अदानी ग्रुपच्या कंपन्या – अदानी टोटल गॅस (रु. ३.९ लाख कोटी) नवव्या आणि अदानी एंटरप्रायझेस (३.८ लाख कोटी) दहाव्या स्थानावर आहेत. तसेच या यादीत भारती एअरटेल (४.८ लाख कोटी रुपये) सहाव्या स्थानावर, HDFC (४.४ लाख कोटी रुपये) सातव्या स्थानावर आणि आयटीसी (४.३ लाख कोटी रुपये) आठव्या स्थानावर आहे.

… अखेर भाऊच धावला भावाच्या मदतीला; संकटात सापडलेल्या अनिल अंबानींना मोठे बंधू मुकेश अंबानीची साथ
कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली वाढ
या अहवालानुसार ऊर्जा, किरकोळ व्यवसाय, हॉटेल, रेस्टॉरंट आणि संबंधित क्षेत्रे आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चांगली वाढ दिसून आली आहे. त्याचवेळी सॉफ्टवेअर आणि सेवा क्षेत्राला गेल्या वर्षीच्या तुलनेत एकूण सहा लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यासोबतच पॉलिसी बाजार, पेटीएम, झोमॅटो आणि नायका सारख्या स्टार्टअप्सच्या मूल्यांकनातही मोठी घसरण झाली आहे.

महिला कर्मचाऱ्यांमध्ये टीसीएस आघाडीवर
लक्षणीय म्हणजे या अहवालात समाविष्ट कंपन्यांच्या संचालक मंडळावर १६ टक्के महिला आहेत. सर्वाधिक महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत टीसीएस २.१ लाख महिला कर्मचाऱ्यांसह आघाडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here