गाझियाबाद: गाझियाबादमधील एनएच-९ येथे असलेल्या आशियाना सोसायटीच्या १४ व्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. वरदान शर्मा असं या तरुणाचं नाव होतं. तो १८ वर्षांचा होता. पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असलेल्या वरदाननं १२ तासांपूर्वी इन्स्टाग्रानवर एक पोस्ट लिहिली. गुड बाय लाईफ असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं होतं. पोलिसांना आत्महत्येची शक्यता वाटत आहे. तर कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास हा प्रकार घडला.

दुकानात जात असल्याचं सांगून वरदान घरातून निघाला होता. मग तो गोल्फ लिंकच्या आशियाना सोसायटीत कसा काय पोहोचला, असा प्रश्न मृताच्या कुटुंबियांनी उपस्थित केला. आशियाना सोसायटी घरापासून ३५ किमी अंतरावर आहे. तिथे वरदानच्या ओळखीचं कोणीच राहत नाही, असं कुटुंबियांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. वरदानला आत्महत्या करायची असती तर तो इतक्या दूर आणि अज्ञात स्थळी का गेला असता, असा प्रश्न त्याचे नातेवाईक विचारत आहेत.
झालं गेलं विसरू! पतीचा पत्नीला शब्द, पण मंदिरात जाताना अप’घात’ झाला; मामला २ कोटींचा निघाला
हापूडच्या आर्यनगरात वास्तव्यास असणारे वरदानचे वडील सुनील शर्मा यांनी या प्रकरणी कवीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण हत्येचं वाटत आहे. याची सखोल चौकशी झाल्यास सत्य समोर येईल, असं शर्मा म्हणाले. मंगळवारी वरदान गढ रोड येथील ऑप्टिकल्सच्या दुकानात बसला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास तो घरी जायचं सांगून निघाला. मात्र घरी पोहोचलाच नाही. रात्री साडे नऊच्या सुमारास एका ओळखीच्या व्यक्तीनं गाझियाबादच्या आशियाना सोसायटीत वरदानचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा घटनाक्रम शर्मांनी कथन केला.
मित्रानं घेतली स्पोर्ट्स बाईक, दोघे ट्रायलसाठी सुसाट निघाले; बराच वेळ परतलेच नाहीत अन् मग..
आशियाना सोसायटीत आमच्या ओळखीचं कोणीच राहत नाही. वरदानचा कोणीही मित्र तिथे वास्तव्यास नाही. मग वरदान तिथे कसा काय गेला आणि कसा पडला, असे प्रश्न शर्मांना पडले आहेत. वरदान हायटेक इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकला प्रथम वर्षात शिकत होता.

आशियाना सोसायटीत वरदानला प्रवेश कसा मिळाला, असा सवाल शर्मांनी उपस्थित केला. प्रत्येक सोसायटीच्या गेटवर चौकशीशिवाय कोणालाच आत सोडलं जात नाही. मग वरदान आत कसा गेला? त्याला कोणी तिथे बोलावलं होतं का? तो १४ व्या मजल्यापर्यंत कसा पोहोचला? असे अनेक प्रश्न शर्मांना पडले आहेत. या सगळ्याची कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here