नवी दिल्ली: शुक्रवारी सोन्याच्या फ्युचर्स किमतीत घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स), फेब्रुवारी २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याचा भाव ८३ रुपयांनी किंवा ०.१५ टक्क्यांनी घसरून ५३,८१० रुपये प्रति १० ग्रॅम होता. यापूर्वी मागील सत्रात फेब्रुवारीच्या करारासाठी सोन्याचा दर ५३,८९३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे एप्रिल २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ६८ रुपयांनी किंवा ०.१३ टक्क्यांनी घसरून ५४,१८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. तर मागील सत्रात एप्रिल कॉन्ट्रॅक्ट सोन्याचा भाव ५४,२५५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

चांदीची फ्युचर्स किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठीची चांदी ९ रुपये किंवा ०.०१ टक्क्यांनी घसरून ६५,४०० रुपये प्रति किलोवर व्यापार करत होती. मागील सत्रात मार्च करारासाठी सोन्याचा दर ६५,४०९ रुपये प्रति किलो होता. याशिवाय मे २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा भाव २८ रुपये किंवा ०.०४ टक्क्यांनी वाढून ६६,२६१ रुपये प्रति किलो होता, जो मागील सत्रात ६६,२३३ रुपये प्रति किलो होता.

डिसेंबर महिन्यात १३ दिवस बँकांना सुट्टी, बरेच लांब वीकेंड देखील; गैरसोय टाळण्यासाठी पाहा ही यादी
जागतिक बाजारात सोन्याची किंमत
दरम्यान, कॉमेक्सवर फेब्रुवारी २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत ०.२७ टक्क्यांनी कमी होऊन १,८१०.३० डॉलर प्रति औंस पातळीवर व्यापार करत होती. त्याचप्रमाणे स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा भाव ०.३१ टक्क्यांच्या घसरणीसह १,७९७.४५ डॉलर प्रति औंसच्या पातळीवर व्यवहार करत होता.

वर्षअखेरीस कर्जदारांना झटका! आयसीआयसीआय बँकेसह PNB ने पुन्हा व्याजदर वाढवले
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत
कॉमेक्सवर, मार्च २०२३ मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी ०.१८ टक्क्यांनी कमी होऊन २२.८० प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होती. त्याचप्रमाणे, स्पॉट मार्केटमध्ये ते ०.४५ टक्क्यांनी घसरून २२.६५ प्रति औंस पातळीवर व्यवहार करत होते.

डिजिटल रुपयातून व्यवहार; UPI पेमेंट, पेटीएम आणि ई-Rupee मध्ये काय फरक? एका क्लिकवर दूर करा गोंधळ
दिल्ली-मुंबईत आज सोन्याचा दर
मुंबई, हैदराबाद, केरळसह काही शहरांमध्ये २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव काल ४९,२५० रुपये होता. तर आदल्या दिवशी किंमत ४८,७५० होती. म्हणजेच, दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३,७३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याचवेळी दिल्ली, मुंबई, दिल्ली आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये चांदीचा भाव ६४ हजार रुपये प्रति किलो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here