राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. मर्सिडीजचे भारताचे प्रमुख संतोष अय्यर यांच्या शब्दांच्या विरोधात त्यांनी व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. त्यांनी लिहिले – काही वर्षांपूर्वी मी मर्सिडीज शोरूममध्ये एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) विकले होते. हा व्हिडिओ २०२० चा आहे, जेव्हा मर्सिडीज ET चा ४० अंडर ४० कार्यक्रम प्रायोजित करत होती.
संतोष अय्यर यांचे शब्द
“जर लोकांनी त्यांची एसआयपी गुंतवणूक लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर हा व्यवसाय खूप सुधारू शकतो,” असे संतोष अय्यर म्हणाले होते. भारतात आलिशान गाड्यांची विक्री खूपच कमी असल्याच्या संदर्भात त्यांनी हे विधान केले. इथे लोक खर्च करण्यापेक्षा पैसे वाचवण्यावर जास्त भर देतात.
पुण्यातल्या खड्ड्यांमुळे मर्सिडीजचे CEO हैराण, गाडीतून उतरताच म्हणाले, पुण्यातले रस्ते तर…
राधिका गुप्तांचा पलटवार
पाकिस्तानात जन्मलेल्या राधिकाने अय्यर यांच्या विधानाचा प्रतिकार केला आणि एसआयपीच्या बाजूने बोलले. “लवकरच आपल्या मुलाच्या नावाने SIP उघडणार आहे, असे त्यांनी सांगितले. राधिका गुप्ता म्हणाल्या, मुलांना कंपाउंडिंगची शक्ती देखील समजावून सांगा आणि जितक्या लवकर तुम्ही ते सुरू कराल तितके चांगले होईल. मुलांना पैसे व्यवस्थापन शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना स्वतःहून गुंतवणूक करायला शिकवणे.
आत्महत्येचा प्रयत्न केला
वयाच्या २२व्या वर्षी राधिकाला कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही. ७व्या नोकरीच्या मुलाखतीत नापास झाल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार केल्याचं त्यांनी सांगितले, पण सुदैवाने मित्रांनी त्यांना वाचवले. राधिका म्हणाल्या, “मी खिडकीतून बाहेर बघत होते आणि उडी मारणारच होते तेव्हा माझ्या मित्रांनी मला वाचवले. त्यानंतर ते मला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेले.” मनोरुग्णालयात डिप्रेशनवर उपचार करण्यात आल्याचे राधिका यांनी सांगितले. ‘मला नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचे असल्याचे सांगितल्यावरच त्यांनी मला वॉर्डातून डिस्चार्ज दिला, असे राधिका यांनी सांगितले. राधिका मुलाखतीसाठी गेली आणि त्या पास झाल्या व त्यांना मॅकेन्झीमध्ये नोकरी मिळाली.