सचिन पायलट कुचकामीः गहलोत
मुख्यमंत्री (ashok gehlot) यांनी सचिन पायलट यांच्यावर अतिशय गंभीर टीका केली. सचिन पायलटची ही प्रतिक्रिया राज्याचे अशोक गहलोत यांच्या विधानावर आली आहे. आपल्याविरोधात आपलेच प्रदेशाध्यक्ष कोर्टात पोहोचले आहेत. ही वेळ काँग्रेसवर आली आहे. सचिन पायलट ७ वर्ष प्रदेशाध्यक्ष होते. पक्ष नेतृत्वाचा त्यांच्या पूर्ण विश्वास होता. पण गेल्या सहा महिन्यात त्यांनी भाजपशी संधान साधून आपल्याच सरकारविरोधात कट रचला. सचिन पायलट हे अकार्यक्षम आहेत हे आपल्याला माहित होतं. तरीही आपण गेल्या सात वर्षात पायलट यांना हटवण्याची मागणी केली नाही, अशी बोचरी टीका अशोक गहलोत यांनी केली.
पायलट यांची ३५ कोटींची ऑफर, आमदाराचा आरोप
भाजप प्रवेशासाठी सचिन पायलट यांनी आपल्याला ३५ कोटींची ऑफर दिली, असा आरोप कॉंग्रेसचे आमदार गिरराजसिंह मलिंगा यांनी केलाय. या ३५ कोटींच्या लाच देण्याच्या आरोपावरून सचिन पायलट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘अशा प्रकारच्या आरोपांमुळे आपण दुखी आहोत. पण याचं आश्चर्य वाटलेलं नाही. असे आरोप करून आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जातोय. मी आजूनही कॉंग्रेसचा सदस्य आहे. राजस्थानमधील नेतृत्वाकडून आमदार आणि कॉंग्रेसचा सदस्य या नात्याने आपणे मांडलेले मुद्दे दाबले जात आहेत. आपल्या बदनाम करण्यासाठी आणि आपली विश्वसनीयता कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्य मुद्द्यांपासून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं सचिन पायलट म्हणाले.
भाजपमधील हलचालींना वेग
भाजप उपाध्यक्ष ओम माथूर यांनी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. भाजपच्या मुख्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा चालली. यात दोन्ही नेत्यांनी राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्षावर चर्चा केली. या बैठकीत राजस्थानमधील सर्व राजकीय घडामोडींची माहिती नड्डा यांनी घेतल्याचं बोललं जातंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times