पुणे- सध्या मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची चर्चा होत असेल तर ती आहे राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाची. अक्षया आणि हार्दिकने मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत केलं लग्न. आता त्यांच्या लग्नातले Exclusive फोटो आणि व्हिडिओ मटा ऑनलाइनकडे आले आहेत. यात नवदाम्पत्य अतिशय सुंदर दिसत असून लग्नातला प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगताना दिसत आहेत.

हार्दिक जोशी

मंगलाष्टकांवेळी वऱ्हाडी मंडळी एकत्रितपणे #अहा असं ओरडताना दिसत आहे. अक्षया आणि हार्दिक यांच्या नावाची आद्याक्षर मिळवून त्यांना हा हॅशटॅग बनवला आहे. तर स्वतः अक्षयाही त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे. या सगळ्यात उपस्थितांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत आहे. अक्षया- हार्दिकच्या लग्नातले Inside Photos पाहून त्यांच्या चाहत्यांनाही नक्कीच आनंद होईल यात काही वाद नाही.

सासूराला जाता जाता उंबरठ्यामध्ये! लेकीच्या हळदीला रडले अक्षयाचे बाबा, अभिनेत्रीने मुलीसारखं सावरलं 95936093
दरम्यान, पारंपरिक पेहरावात नवरदेव आणि नवरी मुलगी अगदी सुंदर दिसत होते. त्यांच्यावरून तर उपस्थितांच्या नजरा हटत नव्हत्या. या दोघांची खास गोष्ट म्हणजे लग्न विधींपासून ते लग्नापर्यंत साऱ्या कार्यक्रमाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामुळेच चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं. आता अक्षयाच्या सप्तपदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.

हार्दिक- अक्षया

आपलं लग्न थाटामाटात व्हावं असं तर प्रत्येकालाच वाटत असतं. यात अक्षया आणि हार्दिक काही वेगळे नाहीत. त्यामुळे त्यांनी अगदी ग्रँड वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. मेंदी, हळद, संगीत आणि लग्न असा भरगच्च कार्यक्रम त्यांनी आखला आणि त्याची विशेष तयारीही केली. महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक दिवशी स्टार कपल अगदी उठून दिसत होतं.

सप्तपदी घेतानाचा अक्षया- हार्दिकचा पहिला Video आला समोर

अक्षया आणि हार्दिकने जून २०२२ मध्ये साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आता अक्षया आणि हार्दिक लग्न बंधनात अडकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here