नवी दिल्ली:भारत बाँड ईटीएफ आजपासून गुंतवणुकीसाठी उघडेल. हा फंड टार्गेट मॅच्युरिटी फंड्सचा (TMF) भाग आहे. सर्व प्रथम आपण हा फंड म्हणजे काय ते नीट समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ते नीट समजून घेणे गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे असते. यामुळे त्याला त्यात गुंतवणूक करावी की नाही हे ठरवण्यास मदत होते. एडलवाईस म्युच्युअल फंडची भारत बाँड ईटीएफचा ही चौथी आवृत्ती असली तरी, फार कमी गुंतवणूकदारांना या फंडबाबत माहिती आहे. भारत बाँड ईटीएफची पहिली आवृत्ती २०१९ च्या अखेरीस आली.

भारत बाँड ईटीएफ म्हणजे काय?
भारत बाँड ईटीएफ हा डेट फंड आहे. जो तुमचे पैसे निश्चित परतावा देणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवतो. हा फंड फक्त अशा सरकारी कंपन्यांच्या बाँड्समध्ये गुंतवणूक करतो, ज्या कंपन्यांना AAA रेटिंग असते. ही योजना ठराविक कालावधीनंतर परिपक्व होते. मग तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतात.

Gold Rate Today: सोने आज स्वस्त झाले की महाग, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर
हा फंड ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांच्या डेट प्लॅनपेक्षा वेगळा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने प्रथम भारत बाँडची कल्पना मांडली. सरकारच्या कंपन्यांमधील गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे आणि निर्गुंतवणुकीशी संबंधित जबाबदाऱ्या हाताळणे हे या विभागाचे काम आहे. सरकारी कंपन्यांना बाजारातून कर्ज उभारण्यास मदत होईल, असा या योजनेबाबत विचार होता.

बाँड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित परतावा मिळवा, जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी, तुम्हाला किती मिळणार रिटर्न
एडलवाईस म्युच्युअल फंडने २०१९ मध्ये पहिल्यांदा भारत बाँड ईटीएफ लाँच केला होता. आतापर्यंत त्यांनी त्याच्या तीन आवृत्त्या सुरू केल्या आहेत. ज्यांचे डिमॅट खाते आहे ते भारत बाँड ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात.

बचतीचा हा फॉर्म्युला आयुष्यभर फॉलो करा, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
फंडचे कार्य कसे ?
सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने भारत बाँड ईटीएफ चांगला आहे. ही योजना केवळ AAA रेटिंग असलेल्या सरकारी कंपन्यांच्या बाँडमध्ये गुंतवणूक करते. सध्या या गुंतवणुकीतून सुमारे ७.५ टक्के परतावा मिळतो. भारत ईटीएफचा ही आवृत्ती एप्रिल २०३३ मध्ये परिपक्व होईल. या बॉंडमध्ये गुंतवणूक ८ डिसेंबरपर्यंत करता येईल.

भारत बाँड ईटीएफचे खर्चाचे प्रमाण केवळ ०.०००५ टक्के आहे. हे गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे. भारत बाँड ईटीएफ २०३३ ही चांगली गुंतवणूक आहे कारण तिचा निश्चित परतावा ७.५ टक्के आहे. तुम्ही याची तुलना बँक मुदत ठेवी किंवा करमुक्त बाँडशी करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here