मुबीन अहमद दळवी असे जळून खाक झालेल्या रिक्षा मालकाचे नाव आहे. या घटनेत दळवी यांची MH 04 KA 8048 या रिक्षाला आग लागली होती. हळूहळू आगीचे स्वरूप रुद्र झाले आणि या आगीमुळे रिक्षाच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दोन चार चाकी गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत MH 01 AT 7068 होंडाई सेंट्रो, MH 48 F 4727 मारुती सुझुकी व्हॅगनार या दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.
thane auto rickshaw fire, Thane : ठाण्यात अग्नीतांडव; रिक्षाला अचानक आग, दोन चारचाकींचे नुकसान; आगीचा Video – fire breaks out in thane sudden fire to a rickshaw damage to two four wheelers fire video
ठाणे : ठाण्यातील मुंब्रा परिसरात संतोष ग्राउंड या ठिकाणी पार्क केलेल्या ऑटो रिक्षाला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, १ रेस्क्यू वाहन उपस्थित झाले. या घटनेत एक रिक्षा जळून खाक झाली असून शेजारी उभ्या केलेल्या इतर दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.