कोल्हापूर: आम्ही पाठवलेले गायीचे पवित्र प्या आणि न्याय बुद्धीने आमच्या मागण्या मान्य करा, अशी विनंती भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी निवेदनासमवेत दूध देण्यात आले. च्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा दिवसभर सुरू होती. ( ‘s Request To )

वाचा:

गायीच्या दूधाला प्रती लिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी करिता प्रती किलो ५० रुपये अनुदान आणि सरकारकडून ३० रुपये प्रती लिटरने दुधाची खरेदी करावी, अशा विविध मागण्या भाजपने केल्या आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेने देखील याच मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी स्वाभिमानीच्या वतीने राज्यभर दूध संकलन बंद करण्यात येणार आहे. रयत च्या वतीने १ ऑगस्टला दूधाने आंघोळ घालण्यात येणार आहे. या आंदोलनात आता भाजपने उडी घेतली आहे. भाजपच्या वतीने एक ऑगस्ट रोजी दूध एल्गार आंदोलन होणार आहे. याबाबत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दूग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी निवेदन दिले. पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी निवेदनासमेवत दूध दिले. हे दूध प्या आणि आमच्या मागण्या मान्य करा अशी विनंती त्यांनी सरकारला केली.

वाचा:

भाजपच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायी, म्हशींचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३५ लाख लिटर दुधाची सहकारी संघाकडून खरेदी केली जाते. ९० लाख लिटर दूध खासगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दूध शेतकरी स्वत: हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. सरकारी योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दूध खरेदी केले जाते. लॉकडाऊनच्या काळात दूधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दूधाची मागणी घटली. सध्या खासगी संस्था व सहकारी संघाकडून दूध १५ ते १६ रुपये दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे दूधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही. यामुळे दूधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

वाचा:

दरम्यान, स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोकुळ दूध संघाने मंगळवारी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला राज्य सरकारच्या दूग्धविकास विभागाने आक्षेप घेतला. यामुळे संघाने निर्णय बदलला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here