त्यानंतर तिची एका हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याचा व्हिडिओ बनवून तिला धमकावले. त्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै २०२१ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले.
त्यानंतर अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चार महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. २६ ऑगस्ट २०२२ला तिला दुसरा मुलगा झाला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार होतच होते.
दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाचा देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या घटनेची आठवण करून दिली. तो तिला म्हणाला की, “श्रद्धाचे तर फक्त ३५ तुकडे केले गेले, तुझे आम्ही ७० तुकडे करू”, म्हणत त्याने पीडितेला धमकावले, असा धक्कादायक आरोप फिर्यादीने केला आहे.
याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
बांधली आयुष्यभराची गाठ! हार्दिक – अक्षयाच्या लग्नाचे लग्नमंडपातील Exclusive Photo