Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फटकेबाजी करत शतक झळकावले. महाराष्ट्राने त्याच्या शतकाच्या जोरावर विजय हझारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत २४८ धावांचा डोंगरही रचला. पण ऋतुराच्या शतकानंतरही महाराष्ट्राला यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. कारण सौराष्ट्र्च्या संघाने यावेळी दमदार फलंदाजी करत महाराष्ट्राचे आव्हान पूर्ण केले आणि यावेळी जेतेपदाला गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले.

महाराष्ट्राच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रची सुरुवात चांगली झाली. कारण सौराष्ट्रला यावेळी चांगली सलामी मिळाली. शेल्डन जॅक्सन आणि हाव्हिक देसाई यांनी यावेळी १२५ धावांची सलामी दिली. त्यामुळे सौराष्ट्रला यावेळी विजयाचा पाया रचला आला. देसाईने यावेळी अर्धशतक साजरे केले, पण अर्धशतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही. त्याने ६७ चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. देसाई बाद झाला तर जॅक्सनने यावेळी संघासाठी दमदार शतकी खेळी साकारली. जॅक्सनने यावेळी तुफानी फटेकबाजी करत महाराष्ट्राच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्राने सलामीवीर देसाईला बाद केल्यावर सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. पण यावेळी जॅक्सन हा एकमेव अडथळा महाराष्ट्राच्या विजयाच्या मार्गात उभा होता. जॅक्सन अखेरपर्यंत उभा राहीला आणि त्यामुळेच सौराष्ट्रला विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद पटकावता आले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.