Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Dec 2022, 5:29 pm
Navi Mumbai : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय व पनवेल वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई करून जप्त केलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करणारे ४७ सायलेन्सर शुक्रवार आज वाहतूक पोलिसांच्या वतीने रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले.

हायलाइट्स:
- बुलेटच्या ‘फटाकडी’ आवाजाचा बंदोबस्त
- पनवेल वाहतूक पोलिसांची कारवाई
- सायलेन्सवर फिरवला रोड रोलर
त्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभाग नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल हद्दीत विशेष मोहीम राबवून एकूण ४७ दुचाकीस्वारांवर मोटर वाहन कायदा कलमान्वये कारवाई करण्यात आली होती. सदर दुचाकीस्वारांनी आपले वाहनाचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर पनवेल वाहतूक शाखेकडे स्वखुशीने जमा केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेलच्या अधिकाऱ्यांकडून ४७ सायलेन्सरची तपासणी करण्यात आली व सदर सायलेन्सर मॉडीफाईड असलेबाबत अभिप्राय दिल्याने पनवेल न्यायालयाकडून सायलेन्सर नष्ट करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आल्यानंतर सायलेन्सर रोड रोलरच्या सहाय्याने दाबून नष्ट करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाले यांनी दिली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.