परभणी : परभणी शहरातील उघडा महादेव परिसरामध्ये असलेल्या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालं आहे. याबाबत काही नागरिकांना मिळाली होती. ही माहिती मिळतात नागरिकांनी उघडा महादेव परिसरातील दोन कॉफी शॉपमध्ये धडक दिली असता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडलेले तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले.

नागरिकांनी या प्रेमीयुगुलांना पकडून सदरील प्रकाराची माहिती नवा मोंढा पोलिसांना दिली. त्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी उघडा महादेव परिसर गाठून कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करत बसलेल्या चार जोडप्यांना ताब्यात घेतलं आहे. या कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित कॉफी शॉप चालकावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लवकरच नागरिक पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत.

Pune : भीषण अपघातात आई, वडिलांसह मुलगा जागीच ठार; पाटस रस्त्यावर आकांत; अख्खं गाव हळहळलं

परभणी शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात कॉफी शॉप थाटण्यात आले आहेत. या ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या नावाखाली घराबाहेर पडलेले तरुण-तरुणी अश्लील चाळे करत बसत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा गंभीर प्रकाराला घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान, शिक्षण घेण्याच्या वयात कॉफी शॉपसारख्या ठिकाणी जाऊन अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आता शिक्षकांसह पालकांनीही लक्ष ठेवण्याची गरज बोलून दाखवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here