भारताविरुद्धची वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी बांगलादेशला एकामागून एक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सारवण्यासाठी आता बांगलादेशने ही नवीन घोषणा केली आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद आता पहिल्या वनेडमध्ये खेळणार नाही. तस्कीन हा बांगलादेशचा अव्वल वेगवागन गोलंदाज आहे आणि त्याने संघाला विजय मिळवून दिले आहेत. पण तस्कीनच्या पाठीला आता गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता पहिल्या वनडे सामन्यात तरी खेळणार नाही, पण त्यानंतर तो खेळणार की नाही याचा निर्णय वैद्यकीय अहवाल पाहून घेतला जाईल, असे बांगलादेशच्या निवड समितीने स्पष्ट केले आहे. बांगलादेशला आता दुसरा धक्का बसला आहे तो कर्णधार तमीम इक्बालच्या रुपात. कारण तमीम हा भारताच्या वनडे मालिकेसाठी सराव करत होता. त्यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीनंतर तमीमने सराव केला नाही. आता तमीम या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बांगलादेशच्या संघाने आपला कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेमध्ये तमीम खेळणार नसून त्याच्या जागी आता बांगलादेशचे कर्णधारपद आता लिटॉन दासकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे आता दास हा बांगलादेशचा नवा कर्णधार असेल. दासला कर्णधारपद मिळाल्यामुळे आता बांगलादेशची फलंदाजी अधिक बळकट होऊ शकते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला सामना ४ डिसेंबरला सुरु होणार आहे. त्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा वनडे सामना हा ७ डिसेंबरला होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे सामना हा १० डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत आता कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर कर्णधार बदलल्यानंतर आता बांगलादेशचा संघ कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.