या प्रकरणी महावीर उत्तम सावंत (रा. अभिषेक हॉटेलमागे, बारामती, मूळ रा. वाफेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. आज शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. ताठे हे त्यांच्याकडील दुचाकी क्रमांक एम.एच ४२ पी २४१० वरून कल्याणी कॉर्नर ते कटफळ चौक बाजूने येत चौकातून रस्ता क्रॉस करत होते.
रस्ता क्रॉस करत असताना अग्निशमन कार्यालयाजवळ डंपर चालकाने ताठे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचा पूर्णतः चेंदामेंदा झाला आणि संतोष ताठे यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतरही डंपर चालकाने दुचाकीसह ताठे यांना डंपरच्या खाली अडकवत पुढे बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत नेले.
दरम्यान, दौंड तालुक्यातील पाटस ते कारखाना या अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दु:खद घटना आज शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. ट्रक आणि दुचाकीचा मोठा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये पाटस येथील पुनर्वसन येथे राहणारे संतोष सदाशिव साबळे, त्यांच्या पत्नी रोहिणी साबळे आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा गुरू साबळे यांचा समावेश आहे. साबळे कुटुंबियांवर अचानकपणे काळाने झडप घातल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.