सुमारे ४५०० एसटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याबाबत महामंडळाच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातं होतं. लॉकडाउनमध्ये एकाही कर्मचाऱ्याला नोकरीवरून कमी करू नका, अशा राज्य आणि केंद्र सरकारच्या सूचना असतानाही हा निर्णय कसा काय घेण्यात आला, असा प्रश्न कामगारांतून उपस्थित होत होता. या अखेर या सर्व प्रश्नांवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मौन सोडलं आहे.
वाचाः
करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीची सेवा अत्यल्प प्रमाणात सुरू असल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. येत्या काळात गरजेनुसार सदरच्या नियुक्त्या पुन्हा करण्यात येतील. असं ट्विट अनिल परब यांनी केलंय. त्याचबरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आलेलं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
‘सरळ सेवा भरती-२०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदावर नियुक्त झालेल्या रोजंदारांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात यावी. सहायक, लिपीक-टंकलेखक, अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार प्रशिक्षण घेणाऱ्यांची सेवाही पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी, असा आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आला असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times