पासाडेना (कॅलिफोर्निया) : सूर्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाकाय काळे खड्डे पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे खड्डे एखाद्या दरीसारखे खोल आणि महाकाय आहेत. हे खड्डे इतके मोठे आहेत की या खड्ड्यांमध्ये पृथ्वी समावून जातील. या महाकाय खड्ड्यांमध्ये तीव्र गतीने उष्ण सौर लहरी वाहत आहेत. शास्त्रज्ञांनी एक नवा खड्डा नुकताच पाहिला आहे. या खड्ड्याचा प्रभाव दोन दिवसात पृथ्वीवर पडेल असे सांगितले जाते. या खड्डयांमधून निघणारी सौर लहर काही समस्या निर्माण करू शकते असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

शास्त्रज्ञांनी या महाकाय खड्ड्यांना कोरोनल होल असे नाव दिले आहे. हे खड्डे सूर्याच्या मध्यभागी तयार झाले आहेत. जेव्हा सूर्याच्या वरील वायूमंडलाच्या इलेक्ट्रिफाइड वायूंचे तापमान कमी होते तेव्हा हे खडडे तयार होत असतात. ते सूर्याच्या इतर भागापेक्षा अधिक गदड असल्याकारणाने ते खड्डे काळ्या रंगाचे असल्याचे दिसतात. दूरवरून पाहिले असता सूर्यामध्ये खड्डा असल्याचे दिसते.

‘ईडी’ च्या दोन मोठ्या कारवाया; मुंबईसह ३ शहरांमध्ये या दलालांवर टाकले छापे
या खड्ड्यांच्या बाजूला सूर्याच्या चुंबकीय रेषा अधिक मजबूत होतात. या मुळे या चुंबकीय रेषा खड्ड्यांमध्ये असलेले सौर पदार्थांना वेगाने बाहेर खेचतात. सध्या या खड्ड्यांमधून बाहेर पडणाऱ्या सौर वादळाचा वेग ताशी २.९५ कोटी किलोमीटर आहे. या लहरीमध्ये प्रखर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि अल्फा कण बाहेर पडतात. पृथ्वीची चुंबकीय शक्ती त्यांना शोषून घेते.

या शोषणाच्या प्रक्रियेत, सूर्याच्या लहरी आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये एक प्रकारे युद्ध सुरू होते. ज्याला जिओमॅग्नेटिक स्टॉर्म म्हणतात. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर वातावरण पातळ आहे. तिथून सौर लहरी वातावरणाला चिरून आत येतात. अशा स्थितीत तेथे रंगीबेरंगी प्रकाश तरंगू लागतात. ज्याला नॉर्दर्न लाइट्स म्हणतात.

ठाण्यात गोवरचा प्रकोप, मुंबई हादरली… आगरकर-कांबळीचा पत्ता कट; वाचा टॉप १० न्यूज
सध्या या खड्ड्यांमुळे पृथ्वीच्या दिशेने येणारे जे सौर वादळ येत आहे, त्या सौर वादळाला जी-१ भूचुंबकीय वादळ असे म्हटले गेले आहे. म्हणजेच त्याच्यापासून फारसा धोका नाही. परंतु त्याने पॉवर ग्रीड आणि काही उपग्रह प्रभावित होऊ शकतात. अगदी अमेरिकेच्या मिशिगन आणि युरोपच्या मायनवरही नॉर्दर्न लाइट्स तयार होऊ शकतात.

यातील पहिला खड्डा भारतात छठ उत्सव साजरा होत असताना तयार झाला होता. त्या दिवशी सूर्याचा हसरा चेहरा प्रसिद्ध करण्यात आला होता. प्रत्यक्षात तेव्हापासूनच हे खड्डे तयार होऊ लागले आहेत. तेव्हापासून सलग चार ते पाच वेळा हे खड्डे तयार झाले आहेत. अलीकडील खड्डा ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दिसला. या खड्ड्याचा परिणाम येत्या दोन दिवसांत पृथ्वीवर होईल असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

हमें जाना है…, जाना हैं तो जाने दो ना; राज्यपालांवर कारवाई केव्हा?, अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here